![]()
मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जाचा बोजा आणि वसुलीसाठी लावण्यात आलेल्या तगाद्याला कंटाळून एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सावंगा गुरव येथे घडली आहे. संदीप अवधूत करडे (रा. शिलोड) असे या शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे सावंगा गुरवसह शिलोड परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या धक्कादायक घटनेची दखल घेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कर्जाचे तीन हप्ते थकल्याने टोकाचे पाऊल प्राप्त माहितीनुसार, संदीप करडे यांची शिलोड येथे अंदाजे एक हेक्टर शेती होती. त्यांच्यावर एका मायक्रो फायनान्स कंपनीचे सुमारे दीड लाख (१,५०,०००) रुपयांचे कर्ज होते. आर्थिक विवंचनेमुळे त्यांना या कर्जाचे सलग तीन हप्ते भरता आले नव्हते. कर्जाचे हप्ते थकल्यामुळे कंपनीकडून सुरू असलेला वसुलीचा तगादा आणि वाढती आर्थिक अडचण यामुळे नैराश्येतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, पोलिसांच्या अधिकृत तपासानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. करडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर संदीप करडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी उज्वला, १७ वर्षांची मुलगी, १२ वर्षांचा मुलगा आणि वृद्ध आई असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अशा अचानक जाण्याने करडे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन अल्पवयीन मुलांचे भविष्य आणि वृद्ध आईच्या पालनपोषणाचा मोठा प्रश्न आता या कुटुंबासमोर उभा राहिला आहे. ‘शेतकऱ्यांना धमकावणाऱ्यांवर कडक कारवाई करू’ या घटनेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करताना ते म्हणाले, “हे जे लोक शेतकऱ्यांच्या मागे लागलेले आहेत, जे मायक्रो फायनान्सचे लोक शेतकऱ्यांना धमकीचे फोन करतायत किंवा त्यांना प्रेशराईझ करतायत, त्याची माहिती सरकारने किंवा प्रशासनाने तत्काळ घेतली पाहिजे. कलेक्टर, तहसीलदार, पंचायत, सरपंच, आमदार किंवा कुणाला तरी हे कळवले पाहिजे. अशा फायनान्स कंपन्यांवर आम्ही निश्चितपणे कडक कारवाई करू.” त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट केले आहे. ————— हेही वाचा.. संभाजीनगरचे पालकमंत्री शिरसाट यांच्या बंगल्याबाहेर 3 मद्यपींचा राडा:दाेन तरुण ताब्यात, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शिरसाटांचा सवाल
शिंदे गटाचे आमदार तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी येथील बंगल्याबाहेर गुरुवारी (१२ नोव्हेंबर) रात्री ११ वाजेच्या सुमारास ३ मद्यपी तरुणांनी गोंधळ घातल्याची घटना घडली. सातारा पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, या प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. सविस्तर वाचा
Source link
मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या?:धमकावणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा