Headlines

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या सदनिकेत चोरी:विमाननगरमधून ईअरपॉड, सूट, लिप पेन्सिल आणि पर्ससह 90 हजार 916 रुपयांचा ऐवज चोरीला; दोन महिलांवर संशय




विधानपरिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विमाननगर भागातील सदनिकेत चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी ईअरपॉड, सूट, लिप पेन्सील, चामड्याची पिशवी असा ९० हजार ९१६ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत तनपुरे यांच्या मोटारीवरील चालक संग्राम चंद्रभान तमनेर ( वय २२) याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील लुंकड स्काय व्हिला सोसायटीत आमदार प्राजक्त तनपुरे यांची सदनिका आहे. सदनिकेतील कपाटात ठेवलेली लुई व्हिटॉन कंपनीची चामड्याची पिशवी (पर्स) जागेवर नसल्याचे तनपुरे यांची पत्नी सोनाली यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मोटारचालक संग्राम याच्याकडे पर्सबाबत विचारणा केली. तनपुरे यांच्या सदनिकेत काम करणाऱ्या महिलांकडे विचारणा करण्यात आली. महिलांच्या मदतीने सदनिकेत ठेवलेल्या पर्सचा शोध घेण्यात आला. त्यानंतर नामवंत कंपनीचे ईअरपाॉड, सूट, लिप पेन्सील अशा महागड्या वस्तू चोरीला गेल्याचे लक्षात आले. २२ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत महागड्या वस्तू चोरीला गेल्या. तनपुरे यांच्या सदनिकेत कामाला येणाऱ्या दोन महिलांनी चोरी केल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. एकूण मिळून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे तपास करत आहेत. ‘बीएसनएल’ची २७ लाखांची तांब्याची तार चोरीला दूरसंचार विभागाकडून (बीएसएनएल) सिंहगड रस्ता परिसरात टाकण्यात आलेली भूमिगत तांब्याची तार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. चोरलेल्या तांब्याच्या तारेची (केबल) किंमत २७ लाख रुपये आहे. तांब्याची तार चोरणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. भूमिगत तार चोरल्यानंतर या भागातील दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली. नागरिकांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर भूमिगत तार चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत ‘बीएसएनएल’चे कार्यकारी अभियंता अतुलकुमार श्रीवास्तव (वय ४५) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बीएसएनएल’कडून २५ वर्षांपूर्वी सिंहगड रस्त्यावरील हिंगणे चौक, संतोष हॉल, ब्रह्मा हॉटेल चौक परिसरात भूमिगत तांब्याची तार टाकण्यात आली आहे. चोरट्यांनी भूमिगत वाहिनीची झाकणे उघडून तांब्याची तार चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. चोरट्यांनी चोरलेली तांब्याची तार साडेचार हजार मीटर असून, तारेची किंमत २७ लाख रुपये असल्याचे कार्यकारी अभियंता श्रीवास्तव यांनी फिर्यादीत म्हटले आहे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *