![]()
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जोडणारा वीरशेत ते गडकुल रस्ता खड्ड्यांमुळे पूर्णपणे खराब झाला असून, या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. जागोजागी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह स्थानिक नागरिक आणि भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातदरम्यान दळणवळण व व्यापारासाठी हा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून महत्त्वाचा मानला जातो. तसेच, या मार्गावरून प्रसिद्ध अनेकरूपी महाराजांच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक ये-जा करतात. मात्र, खड्ड्यांमुळे प्रवास खडतर झाला असून, दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थ आणि प्रवाशांनी अनेकदा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्याचे डांबरीकरण किंवा दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. रस्ता लवकर दुरुस्त करा ^ गेल्या दोन-तीन वर्षांपासून या रस्त्याने प्रवास करतो. अनेकरूपी महाराजांच्या दर्शनासाठी बिलमाळ येथील आश्रमात जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. मात्र, रस्ता खराब झाल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा. – सनी देवरे, भाविक, कळवण
Source link
वीरशेत-गडकुल रस्त्याची चाळण; वाहनचालकांसह भाविक त्रस्त:महाराष्ट्र-गुजरातला जोडणारा महत्त्वाचा मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात