Headlines

Chhagan Bhujbal Statement on Sharad Pawar NDA Entry & Retirement Rumors


राज्याच्या राजकारणात सध्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा संभाव्य ‘एनडीए’ (NDA) प्रवेश आणि येत्या 12 डिसेंबर रोजी वाढदिवसानिमित्त ते राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना मोठे उधाण आले आहे. या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्

.

एनडीए प्रवेश अवघड, पण मुद्द्यांवर आधारित पाठिंबा शक्य

माध्यमांत सुरू असलेल्या शरद पवार यांच्या एनडीए प्रवेशाच्या आणि निवृत्तीच्या चर्चांवर भुजबळ यांनी आपले वैयक्तिक मत रोखठोकपणे मांडले. “मीडियामधून या चर्चा वारंवार येत आहेत. शरद पवार साहेब एनडीएमध्ये जातील असे माझे वैयक्तिक मत नाही, ते थोडे अवघड दिसते. परंतु, एखाद्या विषयावर उदा. डिलिमिटेशन किंवा मतदारसंघ पुनर्रचना त्यांना योग्य वाटले, तर ते एनडीएप्रणित केंद्र सरकारला मदत करू शकतात. जोपर्यंत ते स्वतः निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत कोणालाही खात्रीने काही सांगता येणार नाही.”

12 डिसेंबरच्या निवृत्तीवर मिश्कील टोला

येत्या 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस असून त्या दिवशी ते निवृत्तीची घोषणा करतील आणि पुढचे निर्णय दुसरी फळी घेईल, असे बोलले जात असल्याबद्दल विचारले असता भुजबळ मिश्कीलपणे म्हणाले की, “असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हीच त्यांना कळवा की तुम्ही आता निवृत्ती जाहीर करा!”

अंजली आंबेडकरांच्या ‘बी-टीम’ टीकेवर मौन

वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी-टीम म्हटले जाते, मग आता शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना बी-टीम का म्हटले जात नाही, या अंजली आंबेडकर यांच्या प्रश्नावर “त्या बोलल्या त्याला संबंधित लोक उत्तर देतील, मी काय बोलणार,” असे म्हणत भुजबळ यांनी अधिक बोलणे टाळले.

दुष्काळी तालुक्यांतील ‘केसरी’ कार्डधारकांना मोफत धान्य

राज्यात सुरुवातीला 334 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले होते; मात्र आता नाशिक तालुक्यातील काही मंडळांसह राज्यातील दुष्काळग्रस्त तालुके व मंडळांची संख्या वाढत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारने 4 प्रमुख गोष्टींवर भर दिला आहे.

उद्याच्या मंत्रिमंडळात मोफत धान्याचा प्रस्ताव

पिण्याचे पाणी राखून ठेवण्यासोबतच दुष्काळी तालुक्यांतील गरजू आणि ‘केसरी’ शिधापत्रिकाधारकांना (शहरी भागात 59000 रुपये, ग्रामीण भागात 44000 रुपये तसेच 1 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न गटातील लाभार्थी) मोफत अन्नधान्य देण्याचा प्रस्ताव उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी येत आहे.

चारा निर्मिती व मनरेगातून जलसंधारण

वनजमिनीवर आणि धरणांजवळ चारा निर्मिती करून सरकार तो खरेदी करणार आहे; कालच येवल्यात मका व ज्वारीच्या चारा बियाणांचे वाटप केले. तसेच, भूजल पातळी खाली गेल्याने रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) रस्त्यांऐवजी केवळ पाणी अडवण्याची कामे करण्याचे आदेश निघाले आहेत.

5000 रुपयांच्या अग्रिम मदतीनंतर अंतिम पॅकेज

दिवाळीत अडचण होऊ नये म्हणून 5000 रुपये अग्रिम मदत दिली गेली. आता वाढलेले दुष्काळी तालुके आणि केंद्र सरकारच्या पाहणी समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना अंतिम मदत दिली जाईल.

कुंभमेळ्याच्या 38 हजार कोटींच्या निधीतून गोदावरी प्रदूषणमुक्तीलाच पहिले प्राधान्य हवे!

नाशिक कुंभमेळ्याचे नियोजन आणि गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सुनावले. कुंभमेळ्यासाठी 37000 ते 38000 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मागील कुंभमेळ्यात श्री श्री रविशंकर यांनी गोदावरीचे पाणी इतके प्रदूषित आहे की त्यात बोटही बुडवणार नाही, असे वाईट प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे रस्ते खोदण्यापेक्षा गोदावरी नदी स्वच्छ करणे हेच सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे.

तुकाराम मुंडे व प्रवीण गेडाम कर्तव्यदक्ष अधिकारी

गोदावरी प्रदूषणाच्या अवमान याचिकेत मुख्य सचिवांनी 2009-10 पासूनच्या 199 महापालिका अधिकाऱ्यांच्या जबाबदारीचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले आहे. या यादीत प्रवीण गेडाम आणि तुकाराम मुंडे यांची नावे असल्याबद्दल विचारले असता, “हे दोन्ही अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत; उच्च न्यायालय यावर योग्य निर्णय घेईल,” अशी पाठराखण भुजबळ यांनी केली.

गांधी तलावाच्या नामांतरापेक्षा व्यवस्थापनावर लक्ष द्या

महंत सुधीर दास यांनी नाशिकच्या गांधी तलावाचे नाव बदलून ‘दुध्या तलाव’ करण्याची मागणी केली आहे, तर विश्व हिंदू परिषदेने नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये कायमस्वरूपी दारूबंदीची मागणी केली आहे. यावर नामांतराच्या वादात न पडता ‘अतिथी देवो भव’ भावनेने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

जावेद अख्तर यांना समता पुरस्कार

महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त 28 नोव्हेंबर रोजी पुण्यातील महात्मा फुले वाड्यात होणाऱ्या समता परिषदेच्या सभेत प्रसिद्ध कवी व लेखक जावेद अख्तर यांना यंदाचा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून त्यांनी उपस्थित राहण्यास संमती दिली आहे.

कोयनेचे पाणी आणि अलमट्टीचे बॅकवॉटर

कोयनेचे वीजनिर्मितीनंतर कोकणातून समुद्राला वाहून जाणारे पाणी वर उचलून मुंबईला देता येईल का, यावर चर्चा सुरू आहे. तसेच, अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास सांगलीसारखी शहरे बॅकवॉटरने पाण्याखाली जातात; त्यामुळे हे अतिरिक्त पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे दुष्काळी भागात वळवण्याचा गंभीर अभ्यास मुख्यमंत्री व तज्ज्ञांकडून सुरू असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

—————————————————

हेही वाचा…

विलीनीकरण नको, तरीही महायुतीत या!: भाजपचा शरद पवारांसमोर नवा पर्याय? दिवाळीत गुप्त बैठकांचा दावा; राष्ट्रवादीच्या सत्तासमीकरणात मोठा ट्विस्ट

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळू लागले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू असल्या, तरी आता भाजपने थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर (शरदचंद्र पवार गट) एक नवा आणि अनपेक्षित पर्याय ठेवल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले नाही, तरीही शरद पवार यांच्या पक्षाला स्वतंत्र चौथा घटक म्हणून एनडीए (NDA) आणि महाराष्ट्रातील महायुतीमध्ये सहभागी करून घेण्यास भाजप अनुकूल असल्याची चर्चा सुरू आहे. दिवाळीच्या काळात शरद पवार गटाच्या नेतृत्वाने राज्यातील भाजप नेत्यांसोबत गुप्त बैठका घेतल्याचा दावाही करण्यात येत असून, यामुळे राज्याच्या सत्तासमीकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.