![]()
गोड, तिखट, आंबट, खारट अशा चवींचे पदार्थ…मिठाई आणि विविध प्रकारच्या फळांचा अन्नकोट साकारत श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात लाडक्या गणरायासमोर 551 पदार्थांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध रसास्वादाचे पदार्थ बाप्पाला अर्पण करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबत मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली. याशिवाय तोरण आणि फुले, रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, बळीराजावर जे संकट आले आले, ते दूर होवो आणि महाराष्ट्र व संपूर्ण भारतात सुख-शांती नांदो अशी प्रार्थना यावेळी गणरायाचरणी करण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे भाविकांना करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल 551 हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून हे पदार्थ दिले जातात. शेकडो पणत्यांच्या प्रकाशात उजळली छत्रपती प्रतापसिंह भोसले यांची दुर्लक्षित समाधी! विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या सहभागातून दीपोत्सव; समाधी स्थळाच्या संवर्धनाचा संकल्प त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने शेकडो पणत्यांच्या प्रकाशात भवानी पेठेतील छत्रपती शहाजीराजे प्रतापसिंह भोसले ऊर्फ जंगली महाराज यांच्या दुर्लक्षित समाधीस्थळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. ऐतिहासिक वारसा आणि स्मृती जपण्याच्या उद्देशाने आयोजित या दीपोत्सवामुळे समाधी परिसर पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत छत्रपती घराण्याचे वंशज श्रीमंत छत्रपती शहाजीराजे प्रतापसिंह भोसले ऊर्फ जंगली महाराज यांची समाधी भवानी पेठेतील वॉचमेकर चाळ परिसरात, चंदन मेडिकलच्या मागे आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे ऐतिहासिक योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. मात्र, हा ऐतिहासिक वारसा आणि समाधीस्थळ आजही दुर्लक्षित असल्याने त्याचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
Source link
दगडूशेठ गणपतीला 551 पदार्थांचा नैवेद्य:त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात अन्नकोट; भाविकांनी दिले मिठाई, फळे आणि विविध चवींचे पदार्थ