Headlines

एकाच प्रवेशद्वारातून बसेसची ये-जा; अतिक्रमणांनी कळवणचे रस्ते जाम: बसस्थानक परिसर, न्याती चौक, छत्रपती अंबिका चौकात रोज वाहतूक कोंडी



कळवण शहरातील मुख्य रस्त्यांवर बसस्थानकाचे सुरू असलेले नूतनीकरण, बसेससाठी एकच प्रवेशद्वार आणि वाढते अतिक्रमण यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. बसस्थानक परिसर, न्याती चौक आणि छत्रपती अंबिका चौक या वर्दळीच्या ठिकाणी दररोज वाहनांच्या रांगा लाग

.

कळवण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि मुख्य रस्त्यालगत असलेल्या बसस्थानकात प्रवाशांची मोठी रेलचेल असते. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे, नगर आदी ठिकाणांहून बसेस येतात. त्यामुळे बसस्थानकात बसेसच्या येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वारे असणे आवश्यक आहे. मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरही प्रशासनाने मार्ग काढणे आवश्यक आहे. – शैलेश पवार, नागरिक, कळवण

अतिक्रमण, अवैध पार्किंग, ट्रॅफिक या समस्या सोडविण्यासाठी पोलिस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी संयुक्तपणे सकारात्मक चर्चा झाली आहे. येत्या आठवड्याभरात पुन्हा एकदा बैठक घेऊन या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करणार. नागरिकांनी सहकार्य करावे. – नागेश येवले मुख्याधिकारी नगरपंचायत कळवण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *