Headlines

वीजबंदी आदेशात दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार: शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला निफाडचे तहसीलदार नाईकवाडे यांचे आश्वासन



दारणा धरणाच्या आवर्तनासाठी निफाड, सिन्नर व येवला तालुक्यांतील ३५ गावांमध्ये २२ तास वीजबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या दालनात शेतकरी शिष्टमंडळ व प्रशासनातील अधिकाऱ्यांची

.

दारणा धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडताना पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे आणि अनधिकृत पाणी उपशाला आळा घालावा, यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी १८ नोव्हेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान ३५ गावांमध्ये दररोज २२ तास वीजपुरवठा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे उन्हाळी कांदा लागवड, गहू पेरणी व हिरव्या चाऱ्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. या निर्णयाच्या निषेधार्थ देवगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची होळी करून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. बैठकीस गोदावरी डावा कालव्याचे उपविभागीय अधिकारी संदीप पाटील, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुनील राऊत, दत्तात्रेय पुंडे, मंडळ अधिकारी उल्हास टर्ले, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब भवर, लासलगाव बाजार समितीचे संचालक डॉ. श्रीकांत आवारे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

बैठकीत कोळगाव, कानळद, शिरवाडे व दहेगाव यांसह कालव्याशी संबंध नसलेल्या पाच गावांचा वीजबंदीच्या आदेशात समावेश झाल्याचा मुद्दा शेतकऱ्यांनी उपस्थित केला. या गावांच्या वीजपुरवठ्याबाबत आदेशात दुरुस्ती करण्यासाठी महावितरणच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तातडीने अहवाल सादर करून सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *