Headlines

मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर: गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवे व्यासपीठ, कसा होणार फायदा?



आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या कामकाजाला आता सोशल स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून नवी दिशा मिळू शकते. सोशल स्टॉक एक्स्चेंज हे

.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून हृदयरोग, कर्करोग, किडनी विकार, यकृतविकार, मेंदूविकार तसेच अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र गेल्या काही वर्षात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मदत मिळावी यासाठी अर्ज करणाऱ्या रुग्णांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोशल स्टॉक एक्स्चेंजमुळे अशा निधी उभारणीला व्यापक स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.

सोशल स्टॉक एक्स्चेंज म्हणजे नेमके काय?

सामान्य शेअर बाजारात कंपन्यांचे शेअर्स खरेदी-विक्री केले जातात. मात्र सोशल स्टॉक एक्स्चेंजमध्ये सामाजिक आणि लोककल्याणकारी कामांसाठी निधी उभारणी केली जाते. राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) येथे सेबीच्या (एसईबीआय) नियमनाखाली हे व्यासपीठ उपलब्ध आहे.

पात्र ना-नफा संस्था या व्यासपीठावर नोंदणी करून झिरो कूपन झिरो प्रिन्सिपल या माध्यमातून निधी उभारू शकतात. या माध्यमातून देणगीदारांना सामाजिक कामांसाठी योगदान देण्याची संधी मिळते.

मुख्यमंत्री सहायता निधीला काय फायदा होणार?

1. निधी उभारणीची नवीन संधी : सामाजिक उपक्रमांसाठी देणग्या व गुंतवणुकीच्या माध्यमातून निधी मिळविण्याचा पर्याय उपलब्ध होतो.

2. मोठ्या देणगीदारांपर्यंत पोहोचणे शक्य : कंपन्यांच्या सामाजिक दायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीचा वापर सामाजिक कामांसाठी करण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. विशेषतः वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या निधीची गरज असलेल्या रुग्णांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. तसेच कर्करोग, हृदयरोग, किडनी प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मेंदूविकार आणि दुर्मिळ आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी अतिरिक्त निधी उभारण्यास मदत होऊ शकते. सीएसआर फंड देणाऱ्या कंपन्या, मोठे देणगीदार, फाउंडेशन, सामाजिक गुंतवणूकदार आणि इतर निधी पुरवठादार यांच्यापर्यंत पोहोचता येते.

3. नवीन देणगीदारांचा सहभाग : संस्थेच्या कार्याची माहिती व्यापक स्तरावर पोहोचल्यामुळे नवीन देणगीदार आणि सामाजिक क्षेत्रातील भागीदार मिळण्याची शक्यता वाढते.

4. सामाजिक परिणाम मोजण्याची संधी : संस्थेने केलेल्या कामाचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला, किती कुटुंबांचे जीवनमान सुधारले आणि किती सकारात्मक बदल घडले, हे मोजता येते.

महाराष्ट्रात आधीच सुरू आहेत निधी उभारणीचे प्रयत्न

मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून कॉर्पोरेट कंपन्या आणि रुग्णालयांच्या सहभागातून त्रिपक्षीय निधी उभारणी तसेच स्वयंसेवी संस्थांसोबत सामंजस्य करार अशा उपक्रमांवर काम सुरू आहे. याशिवाय गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी अतिरिक्त आर्थिक स्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी स्थापन करण्यात आली आहे.

गरजू रुग्णांसाठी मोठी संधी

मुख्यमंत्री सहायता निधीचा मुख्य उद्देश आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचे उपचार थांबवू नयेत हा आहे. सोशल स्टॉक एक्स्चेंजसारख्या निधी उभारणीच्या माध्यमातून सामाजिक सहभाग वाढविणे आणि कॉर्पोरेट क्षेत्राला जोडणे शक्य होणार आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री सहायता निधीची नुकतीच नोंदणी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर याद्वारे मिळणाऱ्या अतिरिक्त मदतीचा लाभ दुष्काळग्रस्त भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी होणार आहे. येत्या काळात दुर्मिळ, महागड्या आणि अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या प्रस्तावांची नोंदणी आता या नव्या व्यासपीठावर करण्यात येणार आहे. तसेच त्यामुळे अधिक कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग वाढणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.