Headlines

Admin

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'माझे समकक्ष' म्हटलेय:डीबेटच्या आव्हानावरून चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर, नेमके काय म्हणाल्या?

महिला विधेयकावरून सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यांवरून विरोधकांच्या प्रश्नांचे उत्तरे दिली असून जोरदार हल्लाबोलही केला. तसेच त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डीबेटसाठी तयार असल्याचे म्हटले होते. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली…

Read More

आरबीआयने रुपयाच्या व्यापारावरील निर्बंध हटवले:आता फॉरेक्स डीलर्स NDF मार्केटमध्ये पोझिशन घेऊ शकतील; मार्चमध्ये बंदी घालण्यात आली होती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने 20 एप्रिल रोजी रुपयाची अस्थिरता रोखण्यासाठी परकीय चलन डीलर्स (फॉरेक्स डीलर्स) वर लादलेले काही निर्बंध मागे घेतले आहेत. आता डीलर्स ऑफशोर नॉन-डेलिवरेबल फॉरवर्ड मार्केट (NDF) मध्ये पुन्हा पोझिशन्स घेऊ शकतील. RBI ने हे पाऊल उचलण्यापूर्वी काही दिवसांपूर्वीच गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी संकेत दिले होते की, हे निर्बंध अनिश्चित…

Read More

राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणातून हायकोर्टाचे न्यायाधीश बाजूला झाले:CBI चौकशी-FIRचा आदेश दिला, नंतर मागे घेतला होता

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणातून अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी स्वतःला वेगळे केले आहे. सोमवारी न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्याच्या पोस्टमुळे नाराज होऊन हा निर्णय घेतला आहे. याचिकाकर्त्याने पोस्ट केले होते की, जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते परत करा, अन्यथा तुम्हाला तुरुंगात जावे लागेल. मात्र, त्याने आपल्या पोस्टमध्ये न्यायमूर्तींचा उल्लेख…

Read More

भाजपच्या राज्यात 'नारीशक्ती' बाजूला:जनगणना अन् परिसीमनाचा संबंध जोडताना मुख्यमंत्र्यांची उडाली गाळण, काँग्रेसचा टोला

काँग्रेसने मुख्यमंत्र्यांनी महिला आरक्षणावरून काँग्रेसवर केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत महिला नेत्या उपस्थित होत्या. पण महिलांचा पुळका दाखवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना या महिलांना साधे आपले मत मांडू द्यावे असेही वाटले नाही. अर्थात भाजपच्या राज्यात नारीशक्ती अशीच बाजूला राहते, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यासंबंधी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना…

Read More

अमेरिकेत ट्रम्प टॅरिफचा सर्वात मोठा परतावा सुरू:व्याजासह 90 दिवसांत पैसे परत मिळतील, ₹13.8 लाख कोटी परत करायचे आहेत

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात लावण्यात आलेले शुल्क (टॅरिफ) अवैध ठरवल्यानंतर परताव्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमेरिकन कंपन्या सोमवारपासून नवीन ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा शुल्क परतावा मानला जात आहे, ज्यामध्ये 166 अब्ज डॉलर (सुमारे 13.8 लाख कोटी रुपये) परत केले जाणार आहेत. परतावा देण्याचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या…

Read More

दुचाकीस्वाराकडील 2 लाखांची रोकड लुटणारे अटकेत:कोयत्याचा धाक दाखवून लुटलेल्या आरोपींकडून मुद्देमाल जप्त

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर कोयत्याचा धाक दाखवून दुचाकीस्वाराकडील दोन लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नऱ्हे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट तीनने ही कारवाई केली असून, आरोपींकडून दोन लाख रुपये रोख, दुचाकी, कोयता आणि मोबाईल असा एकूण तीन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना नऱ्हे परिसरातील एका…

Read More

सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' घोषित करण्याची मागणी फेटाळली:सर्वोच्च न्यायालय म्हणाले- प्रसिद्धीसाठी सर्व काही करता, न्यायालयात प्रवेश बंदी घालू

सर्वोच्च न्यायालयाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ‘राष्ट्रपुत्र’ घोषित करण्याची आणि आझाद हिंद सेनेला (INA) भारताच्या स्वातंत्र्याचे श्रेय देण्याची मागणी करणारी जनहित याचिका (PIL) फेटाळून लावली. न्यायालयाने याचिकाकर्त्याला ‘न सुधारणारा’ असे संबोधले आणि कठोर टिप्पणी केली. सोमवारी, सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ता पिनाकपाणी मोहंती यांना फटकारले. न्यायालयाने म्हटले की, त्यांनी यापूर्वीही अशाच…

Read More

पक्षात कोणालाही डावलले जात नाही:ते स्वतःच्या मतांवर निवडून आले म्हणत असतील तर.., शंभूराज देसाईंचे महेश शिंदेंना प्रत्युत्तर

सातारा जिल्ह्यात जर शिवसेनेची ताकद नाही असे आमदार महेश शिंदे म्हणत असतील, ते स्वतःच्या मतांवर निवडून आले असे म्हणत असतील तर तो शिवसैनिकांचा अवमान ठरेल, असे मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले आहे. तसेच पक्षात कोणालाही डावलले जात नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे. महेश शिंदे यांनी पक्षात आपल्याला वेगळी वागणूक मिळत असल्याची…

Read More

थलपती विजय-संगीता घटस्फोट प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली:चेन्नई न्यायालयाने सुनावणी जूनच्या मध्यापर्यंत पुढे ढकलली

तमिळ सुपरस्टार आणि राजकारणी विजय आणि त्यांची पत्नी संगीता सॉर्नालिंगम यांच्यात सुरू असलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणात पुन्हा एकदा महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. चेन्नईच्या चेंगलपट्टू कुटुंब न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार होती, परंतु न्यायालयाने ती पुढे ढकलत आता पुढील तारीख जूनच्या मध्यापर्यंत निश्चित केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, हे प्रकरण न्यायालयाच्या कार्यसूचीमध्ये चौथ्या क्रमांकावर सूचीबद्ध होते आणि…

Read More

मला काही झाले तर संभाजी भिडेंचे धारकरी जबाबदार:माझ्या जीवितास धोका, संरक्षण द्यावे; विकास लवांडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांना गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. वारकरी संप्रदायाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने लवांडे यांना या धमक्या येत असल्याचे समजते. यावरून विकास लवांडे यांनी ट्विट करत संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच मला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री…

Read More