Headlines

Admin

विधानपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत हालचाली:सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी इच्छुकांची रांग; पुण्यासह रायगड-रत्नागिरीत स्पर्धा

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. एकूण 17 जागांसाठी निवडणूक होत असली तरी त्यातील एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि रायगड-रत्नागिरी या दोन महत्त्वाच्या जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी…

Read More

तीन वेळा महाराष्ट्र केसरीच्या शर्यतीमध्ये हरलेला मंगळवेढ्याचा महेंद्र हिंदकेसरी:साताऱ्यातील हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत अखेर मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला विजेता‎

सातारा येथे पार पडलेल्या ५२ व्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये हिंदी केसरीची गदा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावचा सुपुत्र ट्रिपल उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांनी उचलून तालुक्याचे नाव जगपातळीवर झळकावले आहे. सोलापूर जिल्ह्यातील व . पृथ्वीराजवर मात करत पटकावली गदा अन् थार कार कुस्तीला सुरुवात झाल्यानंतर महेंद्रने आक्रमक पवित्रा घेतला होता. महेंद्र गायकवाडने एकेरी पट…

Read More

शेतकऱ्यांना पसंतीचे बियाणे मिळत नसल्याने आमदारांची प्रश्नांची सरबत्ती:लाेकप्रतिनिधींशी चर्चा करून खरिपाचे पुनर्नियोजन हाेणार‎

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे विक्रीचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक मागणी असलेले कपाशी बियाणे ‘अजित-५’ हे वाण शेतकऱ्यांना न मिळाल्याचे पडसाद सोमवारच्या जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीत उमटले. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. शिवसेनेचे (उबाठा) आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण व भाजपचे हरिश पिंपळे यांनी बियाण्यांवरून…

Read More

वाशीम बायपास रोडवर थरार:गॅरेजसमोरील वाहनांना आग

शहरातील वाशीम बायपास रोडवरील बुद्धनगर परिसराजवळ सोमवारी सकाळी एक थरारक, भीषण आगीची घटना घडली. येथील एका ऑटो गॅरेज व सर्व्हिस सेंटरसमोर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांना अचानक भीषण आग लागली. आग इतकी वेगाने पसरली की काही क्षणांतच तिने रौद्ररूप धारण केले. लगत असलेल्या महावितरणच्या विद्युत डीपी (रोहित्र) व त्यावरील जिवंत तारांपर्यंत आगीच्या ज्वाळा पोहोचल्या. त्यामुळे…

Read More

संभाजीनगर-जालना जागेवर शिवसेनेचा दावा;‎ पालकमंत्री म्हणतात, येथे आम्हीच जिंकणार:शिंदेसेनेकडून माजी महापौर नंदकुमार घोडेले, विद्यमान उपमहापौर राजेंद्र जंजाळ इच्छुक

छत्रपती संभाजीनगर-जालना आणि ‎परभणी-हिंगोली या दोन स्थानिक स्वराज्य संस्था ‎‎मतदारसंघांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. ‎‎छत्रपती संभाजीनगर-जालना ही जागा महायुतीत ‎‎शिवसेनाच लढवणार असल्याचा दावा पालकमंत्री ‎‎संजय शिरसाट यांनी केला आहे. शिवसेनेकडून ‎‎सध्याचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि माजी ‎‎महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेक ‎‎पदाधिकारी इच्छुक आहेत. विधान परिषदेचे‎ आमदार अंबादास दानवे हे यापूर्वी आमदार होते. ‎त्यानंतर आता…

Read More

‘Neet’ paper leak; MNS attacks ‘RCC’, class boards and Motegaonkar’s image are covered in black, banners are also torn

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या शहरातील आरसीसी कोचिंग क्लासेसविरोधात सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रवृत्तीविरोधात मनसेने आक्रमक भूमिक . यावेळी मनसेच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला की, येत्या आठ दिवसांत विद्यार्थ्यांचे संपूर्ण पैसे परत करण्यात यावेत तसेच आरसीसी कोचिंग क्लासेस कायमस्वरूपी अकोल्यातून बंद…

Read More

तरुणी, महिलांनी स्वरक्षणात सक्षम असणे ही काळाची गरज- डॉ. गोडबोले:‘हर घर दुर्गा'' अभियानांतर्गत शिवकालीन युद्धकलेचे देणार धडे‎

डाबकी रोड, रेणुका नगर येथील राजेश्वर कॉन्व्हेंट येथे ‘हर घर दुर्गा’ अभियानांतर्गत महिला व तरुणींसाठी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराला रविवारी प्रारंभ झाला. तरुणी, महिलांनी स्वसंरक्षणामध्ये सक्षम असणे ही काळाची गरज आहे, असे मत मुख्य अतिथी डॉ. आरती गोडबोले यांनी याप्रसंगी व्यक्त केले. केवळ शस्त्र चालवता येणे पुरेसे नसून प्रत्येकीने आपल्यामध्ये हिंमतही जोपासावी. त्यामुळे आपल्याला कोणी…

Read More

भोंदू अशोक खरात आता ईडीच्या ताब्यात:52 कोटींच्या व्यवहारांमागे परदेशात पळून जाण्याचा कट उघड; 65 बनावट खात्यांतून उलाढाल

नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात आणि नामकर्ण आवारे प्रकरणात आता मोठी घडामोड झाली आहे. लैंगिक अत्याचार आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरात तसेच पतसंस्थेतील संशयित व्यवहारांप्रकरणी अटकेत असलेल्या नामकर्ण आवारे यांना सिन्नर सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांनाही एकाच वाहनातून न्यायालयात हजर करण्यात आले होते. आवारे यांच्या वकिलांनी पुढील पोलिस…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल-डिझेलचे टँकर न आल्याने 22पेट्रोल पंप पुन्हा ड्राय:नागरिकांनाे, पॅनिक हाेऊन नका, इंधनाचा अतिरिक्त साठा करू नका, दिव्य मराठीचे आवाहन

अमेरिका, इस्रायल आणि इराणसह आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाचा थेट फटका आता छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीसह सर्वसामान्यांना बसू लागला आहे. शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात अचानक घट झाल्याने इंधनाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शनिवारी मागणी केलेले टँकर रविवारच्या सुटीमुळे आले नाहीत. साठा संपल्यामुळे शहरातील 22 पेट्रोल पंपासह वैजापूर, सिल्लोड, फुलंब्री आणि कन्नडमध्ये अनेक पेट्रोल पंप…

Read More

स्रोत स्तरावरील कचरा विलगीकरणावर भर देण्याच्या सूचना:बायोमायनिंग, वैज्ञानिक लँडफिल प्रक्रियेचा घेतला आढावा : घनकचरा प्रकल्पाची पाहणी‎

सुकळी कंपोस्ट डेपोतील बायोमायनिंग प्रकल्पाची २५० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता असून, शहरातून दररोज येणाऱ्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण आणि विलगीकरण बायोमायनिंगद्वारे केले जात असल्याबद्दल माहिती घेण्यात आली. यावेळी मान्यवरांनी ‘स्रोतस्तरावरील कचरा विलगीकरण’ या उपक्रमाला अधिक गती देण्याच्या सूचना केल्या. नागरिकांनी घरातूनच ओला आणि सुका कचरा वेगळा करून दिल्यास संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ, जलद…

Read More