कांद्याच्या भावामध्ये आठ दिवसांत 500 रुपयांची वाढ:पैठण बाजार समितीत 3,308 क्विंटलची आवक; 1,600 ते 2,200 रुपयांपर्यंत मिळाला दर
गेल्या काही महिन्यांपासून कमी दरामुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला असून, अवघ्या आठ दिवसांत कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल ५०० रुपयांची वाढ झाली आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये कांद्याची मागणी वाढल्यामुळे पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे महिन्यांपासून साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाजारात आणण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली असून, बाजार समिती…