Headlines

Admin

नवागतांचे स्वागत, प्राचार्यांचा कानमंत्र; महाविद्यालयात रंगला खास ‘दीक्षारंभ':11 जुलैपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन, सांस्कृतिक उपक्रमाची सफर‎

स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात येथे २०२६-२७ च्या नव्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभ करण्यात आला. दीक्षारंभ नावाने सुरु झालेल्या या नव्या शैक्षणिक सत्रात नवागतांचे स्वागत करुन त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. प्राचार्य डॉ. महेंद्र मेटे यांनी यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही हितोपदेश केला. महाविद्यालयाने सुरु केलेला हा दीक्षारंभ आगामी ११…

Read More

सहकारी बँकांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी दुरुस्ती विधेयकात कठोर शिक्षेची तरतूद करा:10 गुंठ्यांपेक्षा अधिक जमीन तर सोसायटीचा सभासद करा‎

सहकारी बँकांतील गैरव्यवहार, सहकार क्षेत्रातील राजकारण आणि शेतकऱ्यांच्या सभासदत्वाच्या प्रश्नावर ठाम व आक्रमक भूमिका आमदार राजेंद्र राऊत यांनी विधान परिषदेत मांडली. राज्य सरकारने सादर केलेल्या महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक-२०२६ वर चर्चेत स . आ. राजेंद्र राऊत म्हणाले, ज्यांना कधी पिठाची गिरणी काढता आली नाही, अशांनी डीसीसी मधून शेकडो कोटींची कर्जे उचलली. साखर कारखाने काढून…

Read More

‘पंढरपूर कॉरिडॉर’मुळे बाधित निवासी, व्यापारी, भाडेकरुंना भूसंपादन मोबदला:लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्याने नगरसेवकांच्या तक्रारी‎

“पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कोणत्याही नागरिकावर प्रशासन अन्याय होऊ देणार नाही. बाधित निवासी मालमत्ताधारक, व्यापारी मालमत्ताधारक आणि व्यावसायिक भाडेकरु असा तिहेरी लाभ देण्यात येणार आहे. नागरिकांच्या सर्व शंकांचे निरसन करून आणि त्यांचे . पंढरपूर नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके, मुख्याधिकारी महेश रोकडे आणि सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत गुरुवारी पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाचे…

Read More

प्रत्येक वॉर्डाला समान निधी द्या; वरणगाव पालिका सभेत ठिय्या:सकारात्मक आश्वासनानंतर माघार, एकूण 11 विषयांवर चर्चा‎

वरणगाव पालिकेची गुरुवारी सर्वसाधारण सभा झाली. त्यात भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रत्येक वॉर्डाला विकासकामांसाठी समान निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी सभागृहात ठिय्या आंदोलन केले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी समान निधी वाटपाबाबत सकारात्मक भूमिका घेतली. योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले….

Read More

अकोले नगरपंचायतीत सत्ताधारी भाजप आघाडीच्या गटनेतेपदी शेख:जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने फेरबदल; अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर‎

अकोले नगरपंचायतीच्या राजकारणात गुरुवारी एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड समोर आली आहे. सत्ताधारी भाजप आघाडीतील अंतर्गत धुसफूस अखेर चव्हाट्यावर आली. विद्यमान गटनेत्या तथा माजी नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हाधिकारी कार्या . जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन शाखेचे सहआयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी ९ जुलै २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला….

Read More

सोशल मीडियाचा “डिजिटल ट्रॅप” करून शेतकऱ्यांची कोंडी:घोडेगावात 4 गोण्यांना “सोन्याचा भाव’ दाखवून शेकडो क्विंटल कांदा पडत्या भावात लुटला

सोशल मीडिया लाईव्हचा “डिजिटल ट्रॅप’ रचून घोडेगाव उपआवाारात केवळ ४ गोण्यांना ४,२०० रुपयांचा सोन्याचा भाव दाखवून खोटी हवा करण्यात आली. हे आमिष पाहून शेतकऱ्यांनी आवक वाढवताच, त्यांचा शेकडो क्विंटल कांदा पडत्या भावात लुटल्याचा पर्दाफाश झाला आहे. लिलावात . बाजार समित्यांमधील लिलावाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तातडीने लाईव्ह केले जातात. घोडेगावच्या या ४,२०० रुपयांच्या दराचा व्हिडिओही वाऱ्यासारखा…

Read More

मुख्य सूत्रधार 24 तासांत जेरबंद:"सोशल'वर महापुरुषांची बदनामीविरोधात पाथर्डी शहरात ओबीसी समाजाचा मोर्चा

सोशल मीडियावर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आरोपीविरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी गुरुवारी पाथर्डी शहरात ओबीसी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. अजंठा चौकातून निघालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांनी पाथर्डी पोलीस ठाण्यावर धडकला. तेथे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, सोशल मीडियाचा गैरवापर करून सामाजिक अशांतता…

Read More

"जलजीवन'च्या नावाखाली ‘जलमरण’ मिशन:निकृष्ट कामाचा ठपका ठेवत 10 अभियंते तडकाफडकी निलंबित

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेला अहिल्यानगर जिल्ह्यात कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या युतीने कशा प्रकारे सुरुंग लावला, याचे अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले. याप्रकणी दोन कार्यकारींसह दहा अभियंत्यांचे तडकाफडकी निलंबन करून त्यांची विभागीय चौकशी लावण्यात आली आहे. आठवडाभरापूर्वी चार आणि आता पुन्हा ६ असे एकूण दहा…

Read More

तीस दिंड्या अन् हजारो वारकऱ्यांसह ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याला सुरुवात:नेवाशातून पालखी सोहळा मार्गस्थ, नेवासेत पहिला रिंगण सोहळा‎

संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पायी पालखी दिंडीचे बुधवारी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. शासनाची अधिकृत मान्यता मिळाल्यानंतरचा हा पहिलाच पालख . दिंडीचे नेतृत्व ज्ञानेश्वर मंदिराचे देविदास महाराज म्हस्के, ह.भ.प. रामभाऊ राऊत आणि राम महाराज झिंजुरके यांनी केले. प्रस्थानापूर्वी माऊलींच्या पादुकांचे व पैस खांबाचे पूजन भास्करगिरीजी…

Read More

‘चिखलाचा तुडवीत रस्ता, शाळेकडं चल गं माझ्या सखी…’,:केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाच्या मुलींची व्यथा निबंध स्वरूपात मांडण्याचा हा प्रयोग‎

माझ्या शाळेचा रस्ता म्हणजे केवळ एक पाऊलवाट नसून, माझ्या स्वप्नांचा आणि रोजच्या संघर्षाचा एक चिखलमय प्रवास आहे. जेव्हा उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या सुट्या होत्या, तेव्हा आमची मनपा शांत बसली. पण जसा पावसाळा लागला आणि शाळा सुरू झाली, तसे मनपाने आमच्या केडगाव उपनगरात रस्त्याचे काम हाती घेतले. महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता काँक्रिटसाठी खोदून ठेवला….

Read More