पुणे वाहतूक नियोजनासाठी आता 'रिअल टाइम' डेटा वापरणार:विविध यंत्रणांकडून उपलब्ध डेटा एकत्र करून निर्णय
पुणे शहरात वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पुणे महानगरपालिका आता ‘रिअल टाइम ट्रॅफिक डेटा’चा वापर करणार आहे. विविध यंत्रणांकडून मिळणारा वाहतूक आणि प्रवासविषयक डेटा एकत्र करून, त्या आधारे वाहतूक नियोजन, रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांबाबत निर्णय घेण्याचा प्रस्ताव पथ विभागाने तयार केला आहे. या प्रकल्पासाठी ‘पुणे अर्बन मोबिलिटी सेल’ स्थापन…