Headlines

कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध रद्द करावा- तहसीलदारांना निवेदन:जामनेर येथे कृषी विभाग कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज‎

कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करून शेतकरी केंद्रित आकृतीबंध तयार करावा, अशी मागणी जामनेर कृषी विभाग महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. सोमवारी सुधारित आकृतीबंधा विरोधात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. नव्याने तयार करण्यात आलेल्या आकृतिबंधात प्रत्यक्ष क्षेत्रावरील कर्मचारी कमी करून कार्यालयीन कामकाजासाठी कर्मचारी वाढवण्यात आले आहेत. यामुळे क्षेत्रावर ५४ टक्केच कर्मचारी राहणार आहेत. त्यातही…

Read More

वार्षिक 29 लाखांचा लिलाव; तरीही वणीचा आठवडे बाजार भरतो चिखलात:चार महिन्यांत स्थलांतराचे दिलेले आश्वासन हवेतच; विक्रेते पुन्हा रस्त्यावर‎

चार महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार, ग्रामस्थ, पोलिस अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन येथील बाजार मुख्य पटांगणात नियोजनबद्ध पद्धतीने भरविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, चार महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी झा . वणीसह परिसरातील सुमारे २५ गावांतील नागरिक खरेदी-विक्रीसाठी या बाजारात येतात. शेतकरी भाजीपाला व शेतीमाल घेऊन येतात. मात्र, बाजार पटांगणातील मोठा परिसर अद्याप…

Read More

टोमॅटोचे दर घसरल्याने करमाड येथे शेतकऱ्यांचा 30 मिनिटे रास्ता रोको:जालना महामार्गावर वाहतूक कोंडी, बाजार समितीत 17 हजार क्रेट आवक‎

छत्रपती संभाजीनगर उपबाजार समितीच्या करमाड बाजारात टोमॅटोच्या दरात अचानक घसरण झाल्याने बुधवारी शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. मंगळवारी १० ते १७ रुपये किलो असलेला दर बुधवारी थेट ८ ते १३ रुपयांवर आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कालचा दर आजही मिळालाच पाहिजे अशी मागणी करत जालना महामार्गावर ३० मिनिटे रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच…

Read More

वैजापूर शहरामध्ये 246 घरकुलांना 2.46 कोटी रुपये:लाभार्थींना मिळाला दिलासा, 155 लाभार्थींना पहिला, 91 जणांना दुसरा हप्ता‎

स्वतःच्या हक्काच्या घरासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करणाऱ्या वैजापूर शहरातील कुटुंबांसाठी घरकुल योजनेने नवी आशा निर्माण केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत २४६ लाभार्थ्यांसाठी तब्बल २ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्यांना घरकुल मंजुरीपत्रांचेही वितरण करण्यात आले. यामध्ये १५५ लाभार्थ्यांना पहिला, तर ९१ जणांना दुसरा हप्ता देण्यात आला. शहरात यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेतून…

Read More

तक्रारीनंतर 155 दिवसांनी औषध निरीक्षकपद भरतीतपेपरफुटी उघड:एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 अटकेत, आरोपींना 8 दिवसांची कोठडी

आधी एमपीएससीने पेपर फुटल्याचे नाकारले, आता भरती रद्द अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागातील औषध निरीक्षक (गट-ब) पदाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटल्याची पहिली तक्रार २३ मार्च रोजी एफडीएकडे झाली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले. २१ जुलै रोजी एमपीएससीकडे (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) ई-मेलवर तक्रार केली. तेव्हाही पे . या प्रकरणी एमपीएससीचा अवर सचिव अभिजित लेंडवे, दोन सहायक…

Read More

आरक्षण संपवणाऱ्यांविरुद्ध ‎मुंबईत आंदोलन- प्रा. हाके‎:1 सप्टेंबरला राज्यातील ओबीसी समाजबांधव मुंबईत धडकणार‎

राज्यात ओबीसी आरक्षण संपविण्याचे काम ‎‎‎सध्याच्या राज्यकर्त्यांनी केले ‎‎‎असून या विरोधात १‎‎ सप्टेंबरला मुंबईत आंदोलन‎‎ केले जाणार आहे. यामध्ये ‎‎‎हजारो ओबीसी बांधव‎‎सहभागी होणार असल्याचा ‎‎‎दावा प्रा.‎‎लक्ष्मण हाके यांनी बुधवारी ‎केला.‎ हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात ‎ओबीसी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते‎ माध्यमांशी बोलत होते. तत्कालीन पंतप्रधान ‎व्ही. पी. सिंग यांनी लागू केलेल्या मंडल ‎आयोगामुळे ओबीसींच्या आयुष्यात नवीन ‎पर्व…

Read More

ईद-ए-मिलादच्या आनंदावर शोककळा:उरुसासाठी खुलताबादला जाणाऱ्या जालनायेथील दोघांचा संभाजीनगरात अपघाती मृत्यू

खुलताबादच्या जर जरी जर बक्ष उरुसाला जाणाऱ्या जालन्यातील दोघा मित्रांचा संभाजीनगरात अपघाती मृत्यू झाला. क्रांती चौक उड्डाणपुलावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तेते कोणत्याही वाहनाने त्यांना उडवले नाही तर ते स्वत:च पडले असल्याचे माहिती वेदांतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीनिवास रोहिलावर यांनी दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण बाजूला फेकला गेल्याने बचावला….

Read More

संविधानातून टिपू सुलतानचा फोटो काढून दाखवा- जलील:नांदेड मनपात विरोधी पक्षनेतेपद एमआयएमला मिळावे

कुठे वंदे मातरम‌ तर कुठे टिपू सुलतान यांच्या फोटोबद्दल बोलून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. निवडणुका आल्या की असे मुद्दे उपस्थित करून निवडणुका जिंकायची हे भाजपचे सूत्र आहे. असे प्रश्न उचलण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईबद्दल भाजपने बोलावे, असा सल्ला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला. बुधवारी सोलापुरातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मालेगावमध्ये उपमहापौरांनी…

Read More

लाचखोरी आणि रखडलेल्या बिलांनी घेतला कंत्राटदाराचा बळी!:नांदेडच्या ठेकेदाराची मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

राज्यातील कंत्राटदारांची शासकीय देणी प्रलंबित असल्याने कंत्राटदार संघटनांकडून वारंवार ती मिळण्याची मागणी होत आहे. मात्र, वेळेवर बिले न निघाल्याने आर्थिक भार सहन न करू शकणारे काही ठेकेदार टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या दुर्दैवी घटना राज्यात घडत आहेत. सांगलीतील एका कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतर आता नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे रहिवासी असलेले कंत्राटदार गजानन देवकते यांनी मुंबईत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा…

Read More

30 हजार कोटींत किती शाळा, IIT उभारता आल्या असत्या?:कुंभमेळ्याच्या खर्चावर इम्तियाज जलील यांचा सवाल, राजकीय वर्तुळात चर्चा

नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, या अनुषंगाने शहरातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि इतर विकासकामांना मोठा वेग आला आहे. या भव्य आयोजनासाठी सरकारकडून तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा भरघोस निधी खर्च केला जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या या एवढ्या मोठ्या खर्चावरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून,…

Read More