Headlines

चिखलदऱ्याला दररोज एसटी बससेवा द्यावी:हनी व्हिलेजवासीयांनी परिवहन मंत्र्यांसह पालकमंत्र्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी‎

चिखलदरा या पर्यटन स्थळासाठी आठवड्यातून एक दिवस सुरु केलेली बससेवा दररोज द्यावी,’ अशी मागणी आमझरी या ‘हनी व्हिलेज’वासीयांनी केली. त्यांच्यामते महाबळेश्वरच्या धर्तीवर विकासासाठी, पर्यटनाला चालना देण्यासाठी हे आवश्यक असून, त्यामुळे चिखलदऱ्यासह आमझरीचे म . पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा, स्थानिक आदिवासी व व्यावसायिकांच्या रोजगाराला चालना मिळावी, यासाठी अमरावती ते चिखलदरा (हनी व्हिलेज आमझरी मार्गे) दररोज…

Read More

वारीसाठी पोलिसांचा हायटेक बंदोबस्त:अँटी ड्रोन यंत्रणेचा राहणार पहारा, भाविकांच्या सोयीसाठी गुगल मॅपवर दिसणार पार्किंग आणि ट्रॅकिंग सुविधा

Marathi News Local Maharashtra Solapur Police To Deploy High tech Security For Wari; Anti drone System To Guard, Parking And Tracking Facilities To Be Visible On Google Maps For The Convenience Of Devotees पंढरपूर8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी जिल्हा पोलिसांनी अत्यंत चोख आणि आधुनिक सुरक्षेचे नियोजन…

Read More

आता पुरे! गुन्हेगारीविरुद्ध जनतेची एकजूट:संघटित गुन्हेगारी विरोधात श्रीरामपूरच्या इतिहासात प्रथमच भव्य आक्रोश मोर्चा, बंद मागे‎

आकाश दुबय्या हत्येनंतर संतप्त झालेल्या श्रीरामपूरकरांनी बुधवारी हजारोंच्या उपस्थितीत शहराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या जनआंदोलनांपैकी एक मोर्चा काढत सर्व प्रकारच्या संघटित गुन्हेगारीविरोधात निर्णायक लढ्याचा इशारा दिला. सलग तीन दिवस सुरू असलेला श्रीरामपूर बंद जनतेची गैरसोय लक्षात घेऊन तात्पुरता मागे घेण्यात आला असला, तरी जोपर्यंत सर्व प्रकारच्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत विविध मार्गांनी…

Read More

शाश्वत शेतीसाठी शेत जमिनीचे आरोग्य जपणे ही काळाची गरज, डॉ. बोरुडे यांचे प्रतिपादन, खेडले परमानंद येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

आज शाश्वत शेतीसाठी मातीचे आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे. मातीतील सेंद्रिय कर्ब, संतुलित अन्नद्रव्ये, योग्य सामू, सूक्ष्मजीवांची सक्रियता, दर्जेदार सिंचनाचे पाणी आणि योग्य पीक व्यवस्थापन हे जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणारे प्रमुख घटक आहे, असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. सुनील बोरुडे यांनी केले. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी महत्वाच्या उपाययोजनांचीही माहिती त्यांनी दिली. मुळा एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा…

Read More

बाबा फर्जनच्या बंगल्यातील रोकड बँकेत जमा:पोलिसांनी जमा केल्या 4 कोठ्या; आतापर्यंत एकच मोजून पूर्ण झाल्याची माहिती

बाबा फर्जनच्या बंगल्यातून गुन्हे शाखेने जप्त केलेली ५.२६ कोटींची रोकड बुधवारी (१५ जुलै) न्यायालयाच्या आदेशाने एसबीआय बँकेत जमा केली. छावणी पोलिसांनी ४ कोठ्या भरून ही रक्कम बँकेत नेली. सुरुवातीला ५ मशीनद्वारे १६ तास मोजलेली ही रक्कम आता बँक कर्मचारी मोजत असून, बुधवारी केवळ एकच कोठी मोजून पूर्ण झाली होती. एवढी मोठी रोकड आणि शस्त्रे असल्याने…

Read More

गिरणारेत वीजपुरवठा खंडित; अधिकाऱ्यांना घातला घेराव:वीज खंडित झाल्यास ताशी 100 रुपये भरपाई द्यावी‎

गिरणारे गावातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि कमी -जास्त व्होल्टेजमुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या संतापाचा अखेर उद्रेक झाला. भाजपच्या वतीने मंगळवारी इगतपुरी येथील महावितरण कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात आले. संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वीज खंडित असलेल्या प्रत्येक तासासाठी ग्राहकाला १०० रुपये भरपाई द्या, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली. ॲड. मुन्ना पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या…

Read More

मिनार परिसरात बिबट्या बछड्यासाठी दोन पिंजरे:देवगिरी किल्ला परिसरात 2 पथकांकडून शोध‎

ऐतिहासिक देवगिरी किल्ला परिसरात बिबट्याचा वावर असल्याने पर्यटक, पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (१२ जुलै) मध्यरात्रीनंतर वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा एक बछडा जेरबंद झाला. त्यानंतर आता दुसरा बछडा व बिबट्या यांना पकडण्यासाठी २ स्वतंत्र पिंजरे लावण्यात आले आहेत. गेल्या सुमारे ६ महिन्यांपासून किल्ला परिसरात ३…

Read More

शिवना केंद्रातील जि. प. शाळांची अवस्था दयनीय:विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला, सर्व शाळांची मान्सूनपूर्व तपासणी होऊन महिना उलटूनही दुरुस्ती मोहीम नाही‎

. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला, नव्या उमेदीने मुले शाळेत पाऊल ठेवत आहेत. मात्र, सिल्लोड तालुक्यातील शिवना केंद्रात शिक्षण व्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगली असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. येथील शाळा उघड्या पडल्या असून तडकलेल्या भिंती आणि कुचंबणा सहन करणारे विद्यार्थी असे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे…

Read More

केतन अग्रवाल हत्याकांड:सिया आणि चेतनची केवळ मोबाइलवरच विवाहाची चर्चा, लॉजमध्ये प्रतीकात्मक लग्न केले नाही

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यात केवळ मोबाइल चॅट्स आणि फोनवरील संभाषणापुरतीच लग्नाची चर्चा मर्यादित होती. प्रत्यक्षात त्यांचे कोणतेही गुपचूप लग्न झाले नसल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहे. या नवीन माहितीमुळे या प्रकरणातील ‘गुपचूप लग्नाच्या’…

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरण:आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDA ची कारवाई, 8 लाखांचा संशयास्पद माल जप्त

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने मार्केटयार्ड येथील सियाचे वडील प्रवीण गोयल यांच्या मालकीच्या पेढीवर धडक कारवाई केली. या कारवाईत विनापरवाना व्यवसाय आणि भेसळीच्या संशयावरून तब्बल 8 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात…

Read More