Headlines

बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी:बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे “धम्म पहाट” कार्यक्रमाचे आयोजन

पुणे येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती’तर्फे १ ते ३ मे २०२६ या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे यंदा २० वे वर्ष असून, यानिमित्त भव्य खिरदान वाटपही केले जाणार आहे. ही माहिती समितीचे अध्यक्ष आणि पुणे शहराचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. वाडेकर यांनी…

Read More

अमोल मिटकरींची जय पवारांसाठी लॉबिंग:विधान परिषदेच्या जागेसाठी अप्रत्यक्षपणे सूचवले नाव; NCP च्या एका जागेसाठी 7 नावे चर्चेत

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या वाट्याला येणाऱ्या विधान परिषदेच्या एका जागेवर कुणाला पाठवणार? याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. पण तत्पूर्वीच आमदार अमोल मिटकरी यांनी या जागेसाठी जय पवार यांचे नाव सुचवून एकच धुरळा उडवून दिला आहे. राज्यातील विधान परिषदेच्या…

Read More

विद्यार्थ्यांचे शुल्क 6% व्याजासह परत करा:उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आयएलएस विधि महाविद्यालयाला निर्देश

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारावर विद्यार्थ्यांची बाजू न्याय्य ठरवत पुण्यातील एका विद्यालयाला विद्यार्थ्यांकडून वसूल केलेले शुल्क सहा टक्के व्याजासह परत करण्याचे निर्देश दिलेत. विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय,एल,एस, विधि महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या बेकायदेशीर शुल्क वसुलीप्रकरणी राज्य शासनाने ही भूमिका…

Read More

मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये माणुसकीला काळिमा!:शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 4 महिन्यांच्या बाळाचा करुण अंत, कारवाईची मागणी

सरकारी असो किंवा खासगी, आजकाल रुग्णालयांमध्ये माणुसकी आणि संवेदना हरवत चालल्याचे विदारक चित्र वारंवार समोर येत आहे. अशाच एका संतापजनक घटनेत, मुंबईतील प्रसिद्ध वाडिया हॉस्पिटलमधील शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका चार महिन्यांच्या निष्पाप बाळाला आपला जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोप त्याच्या आईने केला आहे. डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाविरुद्ध नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत…

Read More

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करा:कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे खरीप हंगामपूर्व कार्यशाळेत उत्पादक, वितरकांना निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. दुबार पेरणीची वेळ आल्यास बियाण्यांची टंचाई भासू नये, यासाठी मुबलक प्रमाणात बियाण्यांची साठवणूक करावी, असेही ते म्हणाले. कृषी मंत्री भरणे हे शिरनामे सभागृह, कृषी महाविद्यालय…

Read More

बुटीबोरी एमआयडीसीत 9 बालकामगारांची सुटका:धोकादायक परिस्थितीत काम करून घेणाऱ्या संचालकांसह चौघांवर गुन्हे दाखल

बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील नारायणा फॅक्टरीतून धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या नऊ बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. यात चार मुली आणि पाच मुलांचा समावेश आहे. या प्रकरणी फॅक्टरीच्या संचालकांसह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते राकेश भलावी यांनी तक्रार केल्यानंतर प्रशासन आणि बाल संरक्षण पथकाने तातडीने छापा टाकून ही कारवाई केली. छाप्यादरम्यान समोर आलेली…

Read More

वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात:पुणे स्थानकाजवळ रेल्वे डबा रुळावरून घसरला; कोणतीही जीवितहानी नाही, सर्व प्रवासी सुखरुप

पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रेल्वे रुळावरून घसरला. CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22225) ही पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत असताना सायंकाळी ७:३० वाजता डायमंड क्रॉसिंगवर चौथ्या डब्याची एक ट्रॉली घसरली. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनास्थळावरील व्हिडिओ… वंदे भारत ट्रेन रुळावरून घसरल्याची पहिलीच घटना पुणे स्थानकाच्या…

Read More

बागेश्वर बाबाच्या वक्तव्याविरोधात नांदगाव, चांदूरबाजारमध्ये आंदोलन:छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप; कडक कारवाईची मागणी

धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ ‘बागेश्वर बाबा’ यांच्या कथित अवमानकारक विधानांविरोधात काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून नांदगाव खंडेश्वर, चांदूरबाजार आणि अंजनगाव सुर्जी येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी तहसील कार्यालयांवर धडक देत बाबावर तात्काळ आणि कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली. नांदगाव खंडेश्वर येथील आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे…

Read More

विद्यापीठीय कर्मचारी 18 मे पासून आंदोलन करणार:प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासनाविरुद्ध एल्गार

राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाविरुद्ध आंदोलनाची घोषणा केली आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे कर्मचारी १८ मे पासून साखळी आंदोलन सुरू करणार आहेत. ‘महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती’चे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जळगाव येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाकडे वारंवार निवेदने देण्यात…

Read More

भारतीय विद्यापीठ संघाची 100 वी वार्षिक सभा पुण्यात:राज्यपालांच्या हस्ते उद्या उद्घाटन; 400 कुलगुरू सहभागी होणार

भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असलेल्या ‘भारतीय विद्यापीठ संघाची’ (AIU) १०० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद यंदा पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) या परिषदेचे यजमानपद भूषवत आहे. हा शैक्षणिक सोहळा २८ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत संपन्न होईल. १९२५ मध्ये स्थापन…

Read More