Headlines

दंड नाही तर थेट हार घालून स्वागत:हेल्मेट सक्तीसाठी अनोखी कारवाई

रस्ते सुरक्षा आणि हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी तिवसा येथील पंचवटी चौकात आरटीओ विभाग व तिवसा पोलिस प्रशासनाच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले आणि हेल्मेट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या अभिनव उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये…

Read More

पोटच्या गतिमंद मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचार:गुंगीच्या गोळ्या देत 10 वर्षांपासून करत होता छळ, हिंगोलीत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. नोकरीच्या निमित्ताने हिंगोलीत राहणाऱ्या एका निवृत्त जिल्हा परिषद शिक्षकानेच स्वतःच्या गतिमंद आणि अल्पवयीन मुलीवर तब्बल 10 वर्षे वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नराधम वडिलाविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Read More

मातोश्रीबाहेर नीतेश राणेंसाठी बॅनरबाजी:ठाकरेंच्या निवासस्थानासमोर राणेंचा 'हिंदू गब्बर' आणि 'वस्ताद' असा उल्लेख, राजकीय चर्चांना उधाण

भाजपचे नेते नीतेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा ठिणगी पडली आहे. मुंबईतील कलानगर परिसरात, थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्याच्या बाहेरच राणे समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर नीतेश राणे यांचा उल्लेख ‘हिंदू गब्बर’ आणि ‘वस्ताद’ असा करण्यात आला आहे. यामुळे…

Read More

खरीप पिकांवर संकट; मृग नक्षत्र कोरडे; बळीराजा चिंतेत:आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीला दमदार पावसाची गरज; अनेक भागांत धुरळा‎

रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर त्यापाठोपाठ मृग नक्षत्रही पूर्णपणे कोरडे गेल्यामुळे महान व परिसरातील बळीराजा प्रचंड चिंतेत पडला आहे. खरिपातील मूग आणि उडदाची पेरणी मृग नक्षत्रात करणे अत्यंत महत्त्वाचे असते; मात्र पावसाने दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पेरण्या करता आलेल्या नाहीत. बार्शिटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर क्षेत्रावरील जमीन मशागत करून पेरणीसाठी सज्ज ठेवली आहे. मात्र, वरुणराजाने पूर्णपणे…

Read More

मोर्शीत महेशनवमीच्या पर्वावर विविध लोकोपयोगी कार्यक्रम:जपाली हनुमान मंदिर येथे 108 वेळा ओंकाराचा करण्यात आला जप‎

मोर्शी तालुका माहेश्वरी मंडळाद्वारे महेश नवमीच्या शुभमुहूर्तावर आयोजित विशेष कार्यक्रम अगदी धुमधडाक्यात पार पडला. पहिल्या दिवशी शनिवारी डॉ.भरत राठी यांचे दवाखान्यात बीपी,शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रात्री नऊ वाजता जपाली हनुमान मंदिर येथे १०८ वेळा ओंकाराचा जप व सामूहिक हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमात सर्व माहेश्वरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, तर दुसऱ्या दिवशी…

Read More

‘फार्मर कप’साठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा; 40 गावांतून 48 गट सज्ज:गटशेतीचा निश्चितच चांगला परिणाम शेतीमध्ये येईल दिसून‎

पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद या तीन यंत्रणांच्या समन्वयातून शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर कप’ स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील ४० गावांतून एकूण ४८ शेतकरी गट सज्ज झाले आहेत. या गटांच्या माध्यमातून एकात्मिक पीक व्यवस्थापनाच्या सर्व बाबी शेतकरी आपल्या शेतात राबवत आहेत. गटांच्या माध्यमातून सामूहिक स्वरूपात बियाणे, खते, बीज प्रक्रियेसाठी कीटकनाशके व बुरशीनाशके खरेदी करून…

Read More

"मांगी''च्या पाण्यासाठी रोखला रस्ता‎:पावसाळी अधिवेशनानंतर बैठक घेऊन तोडगा काढू

करमाळा तालुक्यातील मांगी तलावातील पाणी हळगाव (ता. जामखेड) येथील कृषी विद्यापीठाला देण्याच्या शासन निर्णयाविरोधात सोमवारी मांगी येथे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. शासनाने काढलेला जीआर तत्काळ रद्द न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा…

Read More

बापाने बिबट्याच्या जबड्यातून 4 वर्षीय लेकीला खेचून काढले:डोंगरगाव येथील काळजाचा ठोका चुकवणारी घटना‎

आढळा खोऱ्यातील डोंगरगाव येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास काळीज हेलावून टाकणारी एक थरारक घटना घडली. घराबाहेर अंगणात आईच्या पाठीवर बसलेल्या ४ वर्षांच्या अवणीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने भक्ष्य समजून झडप घातली. बिबट्या अवणीला जबड्यात पकडून ओढत नेत असताना, तिच्या वडिलांनी जीवाची पर्वा न करता बिबट्याशी थेट दोन हात केले. बापाच्या या अद्भूत धाडसापुढे बिबट्याला माघार घ्यावी…

Read More

कळवण आगारातून सप्तश्रृंगगडासह नाशिकसाठी धावणार आधुनिक बस:5 ‘राजमाता जिजाऊ'' बस दाखल; आणखी 10 बस मिळणार‎

येथील एसटी महामंडळाच्या आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या असून, या बसेसद्वारे कळवण-नाशिक आणि कळवण-सप्तश्रृंगगड मार्गावर सेवा दिली जाणार आहे. या बसेसचे लोकार्पण नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील दुर्गम भागातील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या बसेस आगारात दाखल करण्यात आल्या आहेत….

Read More

पैठणला 35 मिनिटे वाऱ्यासह पाऊस; 12 झाडे उन्मळली:तीन जण जखमी, काही घरांवरील पत्रे उडाले, धान्य मार्केट परिसरामध्ये पाणी तुंबले‎

गेल्या काही दिवसांपासून उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या पैठणकरांना अखेर सोमवारी दिलासा दिला. दुपारी चारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन आलेल्या या पहिल्याच पावसाने वादळी वाऱ्यासह शहराला झोडपून काढले. अवघ्या ३५ मिनिटांत झालेल्या या वादळी पावसामुळे शहरात १२ झाडे कोसळली असून, काही घरांवरील पत्रे उडाल्याने पडझड झाली आहे. या दुर्घटनेत ३ जण जखमी झाले…

Read More