पैठणमध्ये मान्सूनची दमदार 'एन्ट्री':वादळी वाऱ्यासह पहिल्याच पावसाने शहराला झोडपले!
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पैठणकरांना अखेर सोमवारी मान्सूनने दिलासा दिला. दुपारी चारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन काळ्या ढगांनी आकाश व्यापले आणि काही क्षणांतच वादळी वाऱ्यासह मान्सूनच्या पहिल्या दमदार सरींनी शहराला झोडपून काढले. यंदाच्या हंगामातील हा पहिलाच मान्सून पाऊस असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले, या वादळी वार्यासह झालेल्या पावसाने पंचायत समितीच्या समोर एक झाड,व…