Headlines

नाशिक-पुणे थेट सेमी हायस्पीड रेल्वेसाठी 29 ला रास्तारोको:गोंदे फाट्यावर आंदोलन, एकाच वेळी समृद्धी-नाशिक पुणे महामार्ग अडवणार

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग रद्द करण्याची घोषणा केल्याने उत्तर महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे. नेत्यांमधील अंतर्गत मतभेद, श्रेयवाद आणि राजकीय संघर्षामुळेच या प्रकल्पाचा बळी गेल्याचा आरोप सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने केला. या निर्णयाविरोधात आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी दि. २९ जून रोजी सकाळी ८ वाजता गोंदे…

Read More

पिंपरी येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या:लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास

तालुक्यातील पिंपरी येथील २४ वर्षीय तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. दीपक बाळू देहाडे असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री दीपक निरगुडी बुद्रुक येथील गट क्रमांक ९५ मधील आपल्या शेतात गेला होता. तेथे त्याने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइक आणि ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत त्याला…

Read More

उद्यापासून 2 दिवस विठ्ठलाचे "देऊळ बंद’:आज रात्रीपासून विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या जतन व संवर्धनाची प्रकिया सुरू

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे आजपासून तीन दिवस श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर जतन व संवर्धनाची प्रक्रिया केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार ( २२, २३ जून ) या दरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. मागील आठवड्यात भारतीय पुरातत्त्व विभाग, राज्य…

Read More

आजपासून पावसाळी अधिवेशन:विरोधकांची कल्पकता संपली; एआयनिर्मित पत्र दिले : मुख्यमंत्री; विरोधकांनी सभागृहात चर्चा करावी : शिंदे

पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली. फडणवीस म्हणाले, तीन आठवड्यांचे पूर्ण अधिवेशन प्रस्तावित करण्यात आले आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न…

Read More

प्रगतिशील शेतकरी:ऊस, केळीला फाटा देत कढीपत्ता शेतीतून कमावले वार्षिक 15 लाखांचे उत्पन्न; वाचा करमाळ्याच्या शेतकऱ्याची भरारी

पारंपरिक पिकांचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करमाळा तालुक्यात एका तरुण शेतकऱ्याने धाडसी आणि नाविन्यपूर्ण प्रयोग केला. सततचे पाण्याचे संकट, मजुरांची टंचाई आणि बाजारातील चढ-उतार यामुळे ऊस आणि केळीची शेती धोक्यात येत असताना, वडगाव उत्तर येथील सागर थोरवे या युवा प्रगतिशील शेतकऱ्याने कढीपत्त्याच्या शेतीचा एक नवा आणि यशस्वी पॅटर्न तयार केला. कधीकाळी केवळ आंध्र प्रदेशात प्रामुख्याने…

Read More

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीला यश; थकीत ग्रॅच्युईटी याच वर्षी देण्याचाही निर्णय

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या 12 संघटनांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बेस्ट कृती समितीची तब्बल एक तास चाललेली बैठक सकारात्मक ठरली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याने संप मागे घेण्याचा निर्णय कृती समितीकडून जाहीर करण्यात आला. या यशस्वी तोडग्यामुळे…

Read More

कुलगुरु डॉ. बारहाते: सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यास आवश्यक:आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमरावती विद्यापीठात कार्यक्रम

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या सामाजिक आणि कौटुंबिक वातावरणात आरोग्य सांभाळणे हे मोठे आव्हान असून, म्हातारपण निरोगी जाण्यासाठी प्रत्येकाने योगाभ्यास अंगीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचा ‘आजीवन अध्ययन व विस्तार विभाग’, ‘एम.ए. योगशास्त्र’ आणि ‘पी.जी. डिप्लोमा योगा थेरपी’ यांच्या संयुक्त…

Read More

अंजनगाव सुर्जी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा:मुख्याधिकाऱ्यांचे योगाला जीवनशैलीचा भाग बनवण्याचे आवाहन

अंजनगाव सुर्जी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी योगाला जीवनशैलीचा भाग बनवण्याचे आवाहन केले. निरोगी आरोग्यासाठी योगाभ्यास दैनंदिन जीवनात समाविष्ट करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. नगराध्यक्ष अविनाश गायगोले, उपनगराध्यक्ष प्रियंकाताई मालठाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात:दुचाकी आणि पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

राज्यातील रस्ते अपघातांचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. गेल्याच आठवड्यात सोलापूरमध्ये देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची शाई वाळत नाही तोच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आणखी एक काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला आहे. विवाहमांडवा-चौंडाळा रस्त्यावर दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या जोरदार धडकेत…

Read More

छत्री तलाव परिसरात सूर्य निरीक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद:मराठी विज्ञान परिषदेने केले आयोजन, नागरिक-विद्यार्थ्यांचा सहभाग

मराठी विज्ञान परिषद आणि स्टारगेझर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथील छत्री तलाव परिसरात दोन दिवसीय सूर्य निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिक, विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात सुमारे ५० नागरिकांनी भेट दिली, त्यापैकी जवळपास ३० विद्यार्थी आणि पालकांनी विशेष सौर फिल्टरयुक्त दुर्बिणीद्वारे सूर्यबिंब तसेच त्यावरील सौर डागांचे (सन…

Read More