Headlines

अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचंय, त्यासाठीच खासदारांची फोडाफोडी:उद्या शहा मोदींविरोधातच बंड करतील, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देशाचे पंतप्रधान व्हायचे आहे आणि त्यासाठीच शिवसेना व टीएमसी मधील खासदार फोडण्याचे मोठे षडयंत्र त्यांनी रचले आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेली खासदारांची फोडाफोडी याच मोठ्या कटाचा भाग असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या षडयंत्रात सामील…

Read More

विठ्ठल नामाचा गजर करीत दिव्यांग वारकऱ्यांची दिंडी हिंगोलीत दाखल:ठिकठिकाणी स्वागत, ता. 23 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार

दिव्यांग संघ वाशिम यांच्या वतीने आयोजित संत सूरदास महाराज दिव्यांग वारीला वाशिम येथून मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने प्रारंभ झाला असून विठ्ठल नामाचा गजर करीत निघालेल्या दिंडीचे हिंगोली जिल्हयातील गोरेगाव येथे शनिवारी ता. 20 स्वागत करण्यात आले. या दिंडीचे यावर्षी दुसरे वर्ष असून भक्तीभावामध्ये शारीरिक व्यंग आड येत नाही हे या दिव्यांग भाविकांनी दाखवून दिले आहे….

Read More

चोपड्यात वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचा मध्यरात्री रस्ता रोको:शिरपूर-चोपडा मार्गावर दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

शिरपूर तालुक्यातील बभळाज, तरडी व हिसाळे, अजनाड बगला परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर वीजपुरवठा मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी मध्यरात्री बभलाज येथील महावितरण कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे शिरपूर-चोपडा मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन दोन्ही बाजूंना सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कृषी पंपांसाठी रात्री 9 वाजता वीजपुरवठा सुरू होणे अपेक्षित असताना…

Read More

ठाकरे गटाची मध्यरात्री मोठी खेळी:ओमराजे निंबाळकरांच्या मनधरणीसाठी वरुण सरदेसाई पुण्यात, गुपचूप भेटीवर शिंदे गटाची टीका

शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या कथित बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड भूकंप झाला असतानाच, आता पुण्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि नाट्यमय घडामोड समोर आली आहे. बंडखोर खासदारांपैकी ५ जण सध्या दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अज्ञातवासात असल्याची माहिती असताना, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर मात्र पुण्यात आहेत. पवनराजे निंबाळकर यांच्या खुनाचा खटल्याचा काल न्यायालयात निकाल लागल्यानंतर ओमराजे पुण्यातील…

Read More

असुन अडचण, नसून खोळंबा:मोर्विस उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिकात्मक बाजार, कोल्हे गटाच्या निष्क्रियतेचा केला निषेध‎

तालुक्यातील मोर्विस येथील उपबाजार समितीत आज शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक बाजार भरवून सत्ताधारी कोल्हे गटाच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधले. भाड्याने जागा घेऊन सव्वा वर्ष लोटले, तरी अद्याप शेतमालाचे लिलाव का सुरू झाले नाहीत?” असा सवाल विचारत शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनाची सध्या कोपरगाव परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. मोर्विस येथील या आंदोलनात शेतकऱ्यांनी सर्वप्रथम सत्यनारायण पूजा केली….

Read More

वर्षातील सर्वात मोठा रविवार आज:13 तास 13 मिनिटांचे असेल दिनमान, जिज्ञासूंनी अनुभवावा दिवस‎

खगोलप्रेमी आणि जिज्ञासूंसाठी रविवारी (२१ जून) हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या दिवशी उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस अनुभवता येणार असून, एकूण दिवसकाळ (दिनमान) १३ तास १३ मिनिटांचा असणार आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या स्थानिक शाखेचे पदाधिकारी आणि हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर आणि प्रा. प्रवीण गुल्हाने यांनी नागरिकांना या खगोलीय घटनेचा प्रत्यक्ष अनुभव…

Read More

महेश नवमी उत्सवास प्रारंभ; विविध सांस्कृतिक उपक्रमाचे केले आयोजन:महिला मंडळाच्या वतीने नृत्य अभिनय अन् वक्तृत्व स्पर्धा‎

सकल माहेश्वरी समाजाचे महेश नवमी पर्व महानगरात शुक्रवारपासून प्रारंभ झाले आहे. यास समाजाचे महिला-पुरुष उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. स्थानीय माहेश्वरी भवनात उत्सवात माहेश्वरी समाज ट्रस्ट, माहेश्वरी महिला मंडळ, प्रगती मंडळ, नवयुवती मंडळ, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ तथा वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठच्या वतीने विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम सुरू आहे. भवनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी…

Read More

सरसकट कर्जमाफीसाठी विकास मंचाचे निवेदन

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील निकषांमुळे सर्व शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळणार नसल्याचा आरोप करत शेतकरी विकास मंचने चांदूर बाजारच्या तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. निवडणूक काळात शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र नव्या शासन निर्णयामध्ये विविध अटी व शर्ती…

Read More

तरुणावर चाकूहल्ला; हवेत गोळीबार:असोरिया पेट्रोल पंप परिसरातील घटना; जुन्या वादातून हल्ला झाल्याचा संशय‎

नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असोरिया पेट्रोल पंपासमोर एका ३६ वर्षीय तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला. त्यानंतर त्याच ठिकाणी हवेत गोळीबारही झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार जुन्या वैमनस्यातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना शनिवारी (दि. २०) रात्री सुमारे नऊ वाजताच्या सुमारास घडली. शोएब अहमद एजाज अहमद (३६, रा. आझाद कॉलनी, अमरावती)…

Read More

जिल्हा परिषदेच्या 67 शिक्षकांच्या खांद्यावर केंद्रप्रमुखांची जबाबदारी

शिक्षकांमधून निवडावयाच्या केंद्रप्रमुख पदाची प्रक्रिया नुकतीच पार पडली. या प्रक्रियेंतर्गत जिल्हा परिषदेतील ६७ शिक्षकांच्या खांद्यावर नवी जबाबदारी टाकण्यात आली आहे. सदर प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका तसेच संबंधित सर्व न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पार पाडण्यात आली. या अनुषंगाने पात्र जिल्हा सेवा शैक्षणिक (वर्ग-३) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक व प्रशिक्षित शिक्षक संवर्गातील उमेदवारांना…

Read More