शेलगावमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गाव माझा प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक उपक्रम; ग्रामस्थांकडून कौतुक
करमाळा तालुक्यातील मौजे शेलगाव (क) येथील पायघन वस्ती शाळा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण ५३ विद्यार्थ्यांना गाव माझा प्रतिष्ठान यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. या साहित्यामध्ये स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर आदी आवश्यक शैक्षणिक वस्तूंचा समावेश…