Headlines

खड्ड्यांविरोधात ‘छत्रीचा माइक’ अन् प्रशासनाची झोप उडवणारी रिपोर्टिंग:कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथील तीन शाळकरी मुलींचा व्हिडिओ व्हायरल

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथील तीन शाळकरी मुलींनी हातात छत्रीचा माइक पकडून थेट रस्त्यावरून केलेली दणकेबाज “रिपोर्टिंग’ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली अन् निद्रिस्त प्रशासनाला खड्डे बुजवण्यास भाग पाडले. या धाडसी “व्हायरल गर्ल्स’ची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना मुंबईतील “शिवतीर्थ’ निवासस्थानी बोलावून कौतुकाची थाप दिली. तसेच त्यांना अभ्यास करण्याचा सल्लाही दिला….

Read More

लिंबाळा मक्ता जि. प. शाळेचे मुख्याध्यापक निलंबित:मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आदेश, शिक्षण विभागाकडून होता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

हिंगोली शहरालगत लिंबाळा मक्ता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विनोद कटके यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सोमवारी ता. १७ काढले आहेत. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंबाळा मक्ता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कटके हे मद्यपान करून शाळेत येतात, विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत तसेच गावातील व्यक्तींना विनापरवानगी…

Read More

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली, पदोन्नतीची मागणी:'टीईटी' भरतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा, २२ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आणि पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्याची मागणी केली आहे. या मागण्या पूर्ण होईपर्यंत नवीन शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करू नये, अशी त्यांची भूमिका आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यात आले असून, २२ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या राज्यात…

Read More

भारतीय मजदूर संघाचे 11 कलमी मागण्यांसाठी पुणे येथे आंदोलन:मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने सोमवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध उद्योग आणि सेवा क्षेत्रातील एक हजाराहून अधिक कामगार प्रतिनिधी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. कामगारांनी घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधले. या आंदोलनाला भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य तृप्ती…

Read More

हाफकिन संस्थेची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तातडीने कृती आराखडा:राज्यमंत्री योगेश कदम यांनी पिंपरी येथील कामकाजाचा घेतला आढावा

राज्यमंत्री योगेश कदम यांनी पिंपरी येथील हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाला भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. कदम यांनी उत्पादन विभाग, सर्पालय, अश्व संवर्धन विभाग आणि अत्याधुनिक प्रयोगशाळेची पाहणी केली. त्यांनी अँटी-स्नेक व्हेनम सीरमचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला, तसेच राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य…

Read More

गावंडगावच्या कस्तुराबाई मानकर यांचे देहदान:वैद्यकीय शिक्षणासाठी कुटुंबीयांनी घेतला आदर्श निर्णय

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव बुद्रुक येथील ज्येष्ठ नागरिक कस्तुराबाई शंकरराव मानकर यांचे १५ ऑगस्ट रोजी निधन झाले. मृत्यूनंतरही आपले शरीर समाजाच्या आणि वैद्यकीय क्षेत्राच्या उपयोगी पडावे, या उदात्त विचाराने त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी त्यांचे देहदान केले. या निर्णयामुळे मानकर कुटुंबीयांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. कस्तुराबाई मानकर यांनी हयात असतानाच श्री जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या…

Read More

मंत्री दादाजी भुसे यांनी अमरावतीत दिल्या विविध शपथा:जलसंधारण, व्यसनमुक्ती, पॉश कायदा आणि साक्षरतेसाठी नागरिकांना केले आवाहन

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते अमरावती येथे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना जलसंधारण, व्यसनमुक्ती, पॉश कायदा (लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण) आणि साक्षरतेची शपथ देण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य प्रशासकीय कार्यक्रमात ही शपथ घेण्यात आली, ज्यामध्ये राज्य सरकारच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांवर भर देण्यात आला. राज्य शासनाने जलसंधारणावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, कारण भविष्यातील पाणीटंचाई लक्षात…

Read More

'एकनाथ शिंदे कॉंग्रेसमध्ये येणार होते':हुसेन दलवाईंचा दावा; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले- आमची चर्चा झाली, पण काय ते सांगणार नाही

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड व मुंबईतील पत्रकार परिषदेत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार असल्याचा मोठा दावा केला होता. या विधानाची चर्चा सुरू असतानाच, काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनीही एकनाथ शिंदे हेदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र काँग्रेसच्याच काही नेत्यांनी त्यांचा हा प्रवेश होऊ…

Read More

डेटा केबल्सच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे- माजी नौदल प्रमुख:भारताने अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस धोरण सक्षम करावे

माजी नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी भारताला पाण्याखालील क्षेत्राविषयीची जागरूकता (अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस – UDA) तातडीने अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. समुद्रातून जाणाऱ्या संप्रेषण केबल्सचा जागतिक इंटरनेट वाहतुकीत वाढता वाटा लक्षात घेता, महत्त्वपूर्ण सागरी पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी समुद्रतळावरील युद्धतंत्राची क्षमता विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. अॅडमिरल सिंह यांनी सांगितले की, सध्या समुद्रातून जाणाऱ्या…

Read More

पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास अवघ्या दोन तासांत:नितीन गडकरींची मोठी घोषणा, पुण्यातील वाहतूककोंडीवरही केले भाष्य

पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या रस्ते विकासाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण व्हावा, हे माझे स्वप्न असून त्यासाठी शानदार महामार्ग विकसित केला जात आहे. या प्रस्तावित सहापदरी महामार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर…

Read More