Headlines

धक्कादायक:सावखेडा येथील जायकवाडी बॅकवॉटरमध्ये ‎उतरलेल्या दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू‎, विविध संघटनांचा ठिय्या‎

तालुक्यातील सावखेडा येथे‎गोदावरी नदीच्या जायकवाडी ‎‎बॅकवॉटरच्या पाण्यात‎मासेमारीसाठी उतरलेल्या दोन ‎‎सख्ख्या भावांचा पाण्यात‎उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा‎धक्का बसल्याने मृत्यू झाला.‎ यासंदर्भात मिळालेल्या‎माहितीनुसार, सावखेडा येथील‎कैलास नंदू पवार (३४) व‎ज्ञानेश्वर नंदू पवार (२८) हे दोघे‎रविवारी सकाळी साडेदहा‎वाजेच्या सुमारास महानुभाव‎आश्रमाजवळील गोदावरी नदीच्या‎ जायकवाडी बॅकवॉटरच्या पाण्यात‎मासेमारीचे जाळे काढण्यासाठी‎उतरले होते. त्या वेळी त्यांना‎अचानक विजेचा जोरदार धक्का‎बसला. उपस्थित नागरिकांनी त्यांना‎तात्काळ गंगापूर येथील उपजिल्हा‎रुग्णालयात उपचारासाठी…

Read More

लोणी बनवण्यासह पंक्चरशिकले, पटनोंदणीत वाढ:दीड महिन्यात 18 वरून 80

राज्यात जिल्हा परिषद व मराठी शाळांतील घटत्या विद्यार्थी संख्येवर चिंता व्यक्त होते, परंतु जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. शिक्षिका उज्ज्वला वाडेकर यांच्या शैक्षणिक प्रयोगांमुळे या शाळेची विद्यार्थी संख्या दीड महिन्यात १८ वरून थेट ८० वर गेली आहे. वाडेकर यांच्या ‘बियाँड द वॉल्स’ (भिंतींच्या पलीकडे) या संकल्पनेनुसार…

Read More

डोमी शाळेत एकच शिक्षक, गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा:आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष ग्रामसभा

अमरावती, चिखलदरा तालुक्यातील डोमी येथील प्राथमिक शाळेत केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याने गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अतिरिक्त शिक्षकाच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी नुकतीच एक विशेष ग्रामसभा घेतली, ज्यात या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. शिक्षणाचा अधिकार कायदा (आरटीई) विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देतो. या कायद्यानुसार विद्यार्थीसंख्या आणि शाळेच्या स्वरूपानुसार आवश्यक शिक्षकसंख्या निश्चित केली जाते. मात्र, डोमीसारख्या…

Read More

खरगे यांच्या सभेच्या मंचाचे शुद्धीकरण, काँग्रेसकडून निषेध:उत्तराखंडमधील घटनेवर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर झालेल्या सभेनंतर, काही धर्मांध शक्तींनी त्या मंचाचे शुद्धीकरण केले. या घटनेचा काँग्रेसने तीव्र निषेध केला असून, हे केवळ खरगे यांचा नव्हे, तर एका संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचा आणि पर्यायाने संपूर्ण देशाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी,…

Read More

विद्याभारती महाविद्यालयात देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा:विद्यार्थ्यांनी सादर केल्या दर्जेदार कलाकृती, विजेत्यांची घोषणा

अमरावती येथील कॅम्प स्थित विद्याभारती महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्याभारती शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत यांच्या वाढदिवसानिमित्तही हा कार्यक्रम घेण्यात आला. जेम्सच्या अध्यक्षा मंजीरीताई शेखावत यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याभारती शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्ष मेजर प्राचार्य डॉ. एम. एम. राठौर होत्या. प्रमुख अतिथी…

Read More

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनांचा धडाका:आत्मदहनाच्या प्रयत्नांनी प्रशासनाची तारांबळ

विविध शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. दिवसभरात आत्मदहनाचा प्रयत्न, उपोषण आणि बेमुदत धरणे आंदोलन झाल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. वारसाहक्काच्या नोकरीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न जावली तालुक्यातील सोमर्डी येथील…

Read More

10 लाख नागरिकांशी थेट संवादाचे उद्दिष्ट:जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध आरोग्य समित्यांच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे. आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला असून भविष्यात आणखी चार लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी…

Read More

महिला प्रभागसंघांना 4 मालवाहतूक वाहनांचे वाटप:आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजनेअंतर्गत कन्नड तालुक्यात वितरण

छत्रपती संभाजीनगर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजनेखाली कन्नड तालुक्यातील चार महिला प्रभागसंघांना मालवाहतूक वाहनांचे वाटप करण्यात आले. या योजनेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रभागसंघाला महिंद्रा बोलेरो पिक-अप 1.7 घेण्यासाठी 8.50 लाख रुपये देण्यात आले होते. वाहनांची एकूण किंमत 10,90,000/- रुपये होती, ज्यात शासनाचा…

Read More

हायकोर्ट परीक्षा गोंधळ: अभिजित दिपके यांचे आंदोलन सुरूच:लेखी आश्वासन मिळेपर्यंत मागे हटणार नाही, चार मागण्या मांडल्या

छत्रपती संभाजीनगर येथे हायकोर्ट भरती परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. या घटनेनंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. रविवारी शहर परिसरातील सेव्हन हिलजवळील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार…

Read More

15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचा जमाखर्च जाहीर:साताऱ्यातील बैठकीत संयोजन समितीकडून सादरीकरण

विद्रोही सांस्कृतीक चळवळ, महाराष्ट्र च्या वतीने व 15 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे संयोजन समितीचे वतीने दि. 9 व 10 हे रोजी सातारा येथे 15 वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचा जमाखर्च संयोजन समिती व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र च्या वतीने सातारा येथे झालेल्या बैठकीत घेऊन जाहीर…

Read More