Headlines

दंडाची पावती नाही:कारला 3 दिवसांपासून जॅमर; तरुणाने वैतागून स्वत:ची कार पेटवली, संभाजीनगरमधील व्हिडिओ व्हायरल

शहरात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान जिल्हा न्यायालयासमोर पार्क केलेली स्कोडा कार रविवारी (१६ जुलै) पेटवून दिली. विशेष म्हणजे एका तरुणानेच संतापाच्या भरात स्वत:च्याच कारला आग लावली असून त्याने या कृत्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिस ३ दिवसांपासून दंडाची पावती देत नाहीत आणि कारही देत नसल्याचा आरोप या तरुणाने व्हिडिओमध्ये केला आहे….

Read More

पृथ्वीराज चव्हाणांना सध्या काही काम नाही:चर्चेत राहण्यासाठीच त्यांची धडपड; गोपीनाथ मुंडेंवरील दाव्यावरून बावनकुळे संतापले, रोहित पवारांवरही निशाणा

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “पृथ्वीराज चव्हाण यांना सध्या काहीही काम उरलेले नाही, त्यामुळे केवळ मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी ते अशी वक्तव्ये करत आहेत,” असा घणाघात बावनकुळे यांनी केला आहे. तसेच, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या…

Read More

लाडगाव रोडवर दुचाकींची धडक:एक ठार, दोन जखमी

लाडगाव रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एकाचा मृत्यू, तर दोघे जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. राहुल जगन्नाथ लिहिणार (३५, रा. लाडगाव रोड, वैजापूर) असे मृताचे नाव आहे.राहुल लिहिणार हे दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांची धडक झाली. अपघातात लिहिणार यांच्यासह चंद्रप्रकाश प्रजापती व सोमनाथ प्रेमदास…

Read More

दुचाकींची समोरासमोर धडक; चिमुकलीसह तरुणाचा मृत्यू:3 जखमी : कुऱ्हा मार्गावर वीरगव्हाण-मार्डीदरम्यान अपघात‎

शहरातील गाडगेनगरमध्ये राहणाऱ्या होमगार्ड जवानाच्या बुलेटचा समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत अपघात झाला. या अपघातात अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीसह २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. चिमुकलीच्या आई-वडिलांसह आणखी एक तरुण जखमी झाला. हा हृदयद्रावक अपघात रविवारी (दि. १६) सकाळी साडेअकराच्या सुमारास कुऱ्हा मार्गावरील वीरगव्हाण ते मार्डीदरम्यान घडला. या अपघातात अभिज्ञा धीरज तायडे (अडीच वर्षे, रा. गाडगेनगर, अमरावती) आणि…

Read More

कर्जमुक्ती योजनेत 66,147 शेतकऱ्यांना 627.40 कोटी:2.41 हजार कोटी‎रुपयांच्या माफीची प्रतीक्षा‎

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६६ हजार १४७ थकीत पीक कर्जदार शेतकरी सभासदांच्या खात्यावर ६२७.४७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्हा बँकेच्या २७७ शाखांमार्फत १३६६ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. बँकेच्या प्रशासक संगिता डोंगरे यांनी ही माहिती दिली. शासनाकडून आधारप्रमाणीकरणासाठी…

Read More

कळवण:मानूरला उद्यापासून हरिनाम सप्ताह

तालुक्यातील मानूर येथे दि. १८ ते २५ ऑगस्टपर्यंत २३ वा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ग्रामदैवत हनुमानराय, मार्कडेश्वर भगवंत व ब्रह्मलिन स्वामी गोविंद भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच स्वामी हर्षद भारती महाराज, शशिकांत मुडावदकर, नितीन मुडावदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होणार आहे. श्री मार्कडेश्वर बहुद्देशीय भजनी सेवा मंडळ,…

Read More

भोकणी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार:जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण‎

सिन्नर तालुक्यातील ‘झाडाचे गाव’ म्हणून नावारूपाला आलेल्या भोकणी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नाशिक आयुक्त कार्यालय, नाशिक येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच अरुण वाघ व ग्रामसेवक योगेश राहाणे यांनी पुरस्कार स्वीकारला. वृक्षलागवड व संवर्धन, पर्यावरण संरक्षण, जलसंधारण…

Read More

गवळीशिवरा:महारुद्र मारुतीच्या चरणी 1 लाख भाविक नतमस्तक

मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र गवळीशिवरा येथील नवसाला पावणाऱ्या प्रसिद्ध महारुद्र मारुतीच्या दर्शनासाठी श्रावणमासातील पहिल्याच शनिवारी लाखो भाविकांची गर्दी झाली होती. विशेष म्हणजे श्रावणमासातील पहिल्या शनिवारी, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मंदिरात तिरंगी रंगाचे फुग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. सकाळपासून भाविकांच्या गर्दीने सर्व रस्ते फुलून निघाले होते. दरम्यान, श्रावण महिन्यात लहान मुले, महिला भाविक दूरवरून…

Read More

खामगाव:श्री गोरक्ष विद्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील श्री गोरक्ष शैक्षणिक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या श्री गोरक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य मोहन पाटील सोनवणे होते. तर संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक अभिलाष पाटील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम ढोल-ताशा, लेझीम…

Read More

प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे स्थानिक दुकानदारांवर आली उपासमारीची वेळ:श्रावणात घृष्णेश्वर मंदिरातील नियोजनाकडे दुर्लक्ष, व्यावसायिक संतप्त‎

श्रावण महिन्यानिमित्त महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात यंदा प्रशासनाच्या नियोजनाअभावी भीषण अव्यवस्था निर्माण झाली आहे. दर्शनासाठी ६ तासांपर्यंत रांगेत उभे राहावे लागत असल्याने भाविक गुदमरत आहेत. दुसरीकडे रस्ते बंद आणि कठोर निर्बंधांमुळे स्थानिक दुकानदार आणि हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. Source link

Read More