Headlines

'राष्ट्रवादी' MP अन् PM यांची 25 दिवसांत चौथी भेट:सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात NCP शरद पवार गटाचे 8 खासदार मोदींना भेटले; कारण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या आठ खासदारांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास पंतप्रधान कार्यालयात ही बैठक झाली. मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामे, राज्यातील पाणीटंचाई, शेतकरी, विद्यार्थी आणि इतर लोकहिताच्या प्रश्नांवर यावेळी चर्चा झाल्याचे समजते. भेटीच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष…

Read More

अमोल मिटकरींनी स्वतःच्या खच्चीकरणाकडे लक्ष द्यावे:योगेश कदम यांचा पलटवार; गणेश नाईकांना दिला इशारा, जरांगे पाटलांना आवाहन

“आमदार अमोल मिटकरी यांनी रायगड जिल्ह्याच्या राजकारणात नाक न खुपसता सध्या स्वतःच्याच पक्षात त्यांचे जे खच्चीकरण सुरू आहे, त्याकडे लक्ष द्यावे. तर आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील जहरी टीका तत्काळ थांबवावी. शिंदे साहेबांनी जर उठाव केला नसता, तर आज नाईक साहेब मंत्रीही झाले नसते,” असे खडेबोल सुनावत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विरोधकांवर…

Read More

राज्यात 526 अनधिकृत शाळांचा सुळसुळाट:केवळ 43 शाळा बंद, शिक्षण विभागाची कारवाई संथ गतीनेच

महाराष्ट्रामध्ये अनधिकृत शाळांचा सुळसुळाट वाढला असून, शिक्षण विभागाची कारवाई मात्र अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे समोर आले आहे. राज्यात एकूण 526 अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. यापैकी केवळ 155 शाळांवरच गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत, तर 429 शाळांना दंडात्मक नोटिसा बजावूनही प्रशासनाला केवळ 8 शाळांकडूनच दंड वसूल करण्यात यश आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय…

Read More

अभिजीत दीपकेंविरोधात उपोषण करणाऱ्यांची प्रकृती खालावली:पोलिसांकडून रुग्णालयात दाखल; आंदोलकांचा उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा

कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आता नवे वळण लागले आहे. गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले मनीष ब्रह्माभट आणि राहुल पांड्या यांची प्रकृती खालावल्याने, पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, “पोलिसांनी आम्हाला बळजबरीने रुग्णालयात दाखल केले असून, आमचे हे उपोषण कोणत्याही परिस्थितीत…

Read More

खासगी कंपनीच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप ग्रूप; 40लाख रुपयांची सायबर फसवणूक:कर्मचाऱ्याच्या फिर्यादीनंतर पुण्याच्या अलंकार पोलिसांकडून तपास सुरू

पुण्यात एका खासगी कंपनीच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट समूह (ग्रुप) तयार करून सायबर चोरट्यांनी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कंपनीतील एका कर्मचाऱ्याने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कर्मचारी एरंडवणे येथील एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. सायबर चोरट्यांनी ‘वर्क ग्रुप…

Read More

गडचिरोली हादरली:आश्रमशाळेत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू, आश्रमशाळा प्रशासनाविरोधात संतापाची लाट

गडचिरोली जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील एका निवासी आश्रमशाळेत झोपेत असताना सर्पदंश झाल्याने तीन चिमुकल्या विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्हा सुन्न झाला असून आश्रमशाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जपतलाई येथील या निवासी आश्रमशाळेत नेहमीप्रमाणे रात्री सर्व विद्यार्थिनी…

Read More

वादळी पावसाचा इशारा:पुणे घाटांसह अकोला-अमरावतीत मुसळधार पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात पावसाचा लपंडाव सुरू असतानाच, आता पुन्हा एकदा काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः पुण्याचा घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ हवामान खात्याने आज पुण्याच्या घाटमाथ्यावरील परिसरासह विदर्भातील अकोला आणि…

Read More

दारूबंदीविरोधात महिलांचा एल्गार; गावातील विक्रेत्यांच्या घरांवर धडक:युवापिढी व्यसनाधीन होत असल्याचे गंभीर चित्र समोर‎

तालुक्यातील हिवरा कोरडे परिसरासह संपूर्ण तालुक्यात सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीमुळे महिला आणि पालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे गावात दारूबंदीविरोधात महिलांनी एल्गार पुकारात विक्रेत्यांच्या घरांवर धडक दिली. संपूर्ण तालुका दारु आणि अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडले असून युवापिढी व्यसनाधीन होत असल्याचे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे.हिवरा कोरडे गावातील महिलांच्या संतापाचा अखेर उद्रेक होऊन दारू विक्रीला…

Read More

‘एमबीबीएस’च्या पन्नास जागांचा प्रस्ताव प्रलंबित:सहा महिन्यांपासून मंजुरीची प्रतीक्षा कायम‎

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमाच्या ५० जागा वाढवण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला असून ‘तो’ शासन दरबारी प्रलंबित आहे. सध्या महाविद्यालयात २०० जागांवर प्रवेश दिला जात असताना प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास प्रवेश क्षमता २५० पर्यंत वाढणार आहे. अद्याप जागावाढीबाबत शासनाचा अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ५० अतिरिक्त जागांवर यंदाच प्रवेश मिळणार की…

Read More

प्रबाेधनात्मक उपक्रम:लोकप्रतिनिधींनी कायद्यांसह नियम, सभागृह कार्यपद्धतीचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक

मनपाच्या कामकाजात जनप्रतिनिधींची भूमिका अधिक प्रभावी, सक्षम आणि जबाबदार करण्याच्या उद्देशाने मनपा आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नागपूर यांच्या संयुक्त सहकार्याने नगरसेवक व नगरसेविकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. शनिवारी ८ ऑगस्टला सकाळी १० वाजता डॉ. पंजाबराव देशमुख प्रबोधिनी सभागृह येथे ही कार्यशाळा झाली. महापालिकेच्या सभागृहात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना विविध कायदे, नियम, अधिनियम,…

Read More