Headlines

नक्षलवादाचा बिमोड: केंद्र-राज्य सरकारचे मोठे योगदान:विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले स्पष्ट

नागपूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी नक्षलवादाचा बिमोड करण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वित प्रयत्नांचे मोठे योगदान असल्याचे मत व्यक्त केले. पुणे संवादतर्फे आयोजित ‘नक्षलिझम : ए वॉर विदिन’ या परिसंवादात ते बोलत होते. एस. पी. कॉलेजच्या काकासाहेब चितळे सभागृहात हा परिसंवाद पार पडला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More

बीना लिमकर यांच्या 'फंक्शन्स' पुस्तकाचे प्रकाशन:गणित रंजन करते, अंजनही घालते – अच्युत गोडबोले

गणित हा विषय गुंतागुंतीचा असला तरी तो रंजन करणारा आणि ज्ञान देणारा (अंजन घालणारा) असू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक डॉ. अच्युत गोडबोले यांनी केले. डॉ. बीना लिमकर लिखित ‘द सिक्रेट लाईफ ऑफ फंक्शन्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. सीगल प्रकाशनातर्फे आयोजित या कार्यक्रमात डॉ. गोडबोले यांच्यासह ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. विनय वैद्य, महर्षी…

Read More

वसमतमध्ये वृद्ध महिलेला फसवून सोने-चांदी लुटणारा जेरबंद:स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, एकाचा शोध सुरू

वसमत येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिलेस पाकिट पडल्याचे भासवून त्यांना बाजूला नेत त्यांच्या अंगावरील दागिने पळविणाऱ्या लातुर जिल्हयातील शिरूर ताजबंद येथील एका भामट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ता. ९ अटक केली असून त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पारवा येथील शांताबाई कदम ह्या बुधवारी ता. ५ वसमत येथे देवदर्शनासाठी आल्या…

Read More

7.42 कोटींची फसवणूक; सायबर रॅकेटचा पर्दाफाश:फसवणुकीसाठी बँक खाती पुरवल्याचे स्पष्ट

देशभरातील ४२ प्रकरणांमध्ये तब्बल ७.४२ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या सायबर फसवणुकीसाठी बँक खाती पुरवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, शनिवारी एका पोलिस अधिकाऱ्याने या कारवाईची माहिती दिली. ऑनलाइन टास्कचे आमिष खार पोलिस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यातून हे रॅकेट उघडकीस आले. गुन्हेगारांनी…

Read More

सुप्रीम कोर्टावर दबावासाठीच मोदींचा बंडखोरांना ‘भिऊ नका’ संदेश- उद्धव:सहा फुटीर खासदार दिल्लीत पंतप्रधानांना भेटल्याने संताप

शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी शिवसेनेच्या (शिंदे) बंडखोरांची भेट घेतली. त्यांना ‘भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे’ असे म्हटले. न्यायालयावर दबाव आणण्यासाठीच मोदींनी ‘भिऊ नको’चा संदेश दिल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, कायदेशीर लढाई सुरू असताना देशाच्या प्रमुखांनी अशा प्रकारे राजकीय अभय देणे…

Read More

कालव्यांची गळती थांबणार; दुरुस्तीसाठी 150 कोटींचा निधी:भंडारदरा, जायकवाडीच्या पाण्याचे न्याय्य नियोजन करणार- मंत्री विखे‎

दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्णत्वास न्यायचा असेल, तर पारंपरिक सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेला महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम राज्याच्या जल व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत भंडारदरा प्रकल्पाच्या सात्रळ…

Read More

गेमद्वारे मोबाइलमधून घराचे मॅपिंग:मुलीचे आक्षेपार्ह फोटो मागवून 9 महिने ब्लॅकमेल, रोब्लॉक्स गेममधील एका चुकीने माझे आयुष्य नरक बनवले

14 वर्षांच्या शाळकरी मुलीची आपबिती तिच्याच शब्दांत; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल रोब्लॉक्स या ऑनलाइन गेमच्या माध्यमातून १४ वर्षांच्या एका मुलीच्या मोबाइलद्वारे घरातील सर्व खोल्यांचे मॅपिंग केले. नंतर तिच्याशी चॅटिंगद्वारे तिच्याशी संपर्क साधून बँक खात्यातून यूपीआयद्वारे पैसे काढण्याची धमकी देत, नग्न छायाचित्र पाठवण्यास भाग पाडले. . त्यानंतर मुंबईतील एका आरोपींनी थेट आई-वडिलांशी संपर्क साधून आणि अश्लील फोटोंचा…

Read More

तुमची जमीन हेच तुमचं अस्तित्व, जमिनी विकू नका:थेट उद्योगांत पार्टनर व्हा; राज ठाकरेंचे कोकणवासीयांना आवाहन, मुंबई-गोवा महामार्गाची केली पाहणी

मुंबई-गोवा महामार्गाचे काम केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे रखडले आहे. विकास प्रकल्पांच्या नावाखाली स्थानिकांच्या जमिनी हडप केल्या जात असून, महाराष्ट्रात जमिनी विकण्याचाच धंदा सुरू आहे, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे रायगड दौऱ्यावर असून ते आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत त्यांनी ‘तिसरी मुंबई’, कंत्राटदारांची पळापळ आणि कोकणवासीयांचे भवितव्य…

Read More

‘ड्रॅगन’ची गोड क्रांती; निंभोरेचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी ठरतोय दिशादर्शक:100 एकरांवर ड्रॅगन फ्रूटची लागवड; कमी पाण्यात विक्रमी उत्पादन

दुष्काळी भागातही आधुनिक तंत्रज्ञान, नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अचूक अभ्यास यांच्या बळावर शेती फायदेशीर ठरू शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण करमाळा तालुक्यातील निंभोरे गावाने घालून दिले आहे. पाण्याची टंचाई कायम भेडसावणाऱ्या या गावात आज तब्बल १ . निंभोरे येथील युवा शेतकरी हरीभाऊ दळवे यांनी २०२२ मध्ये एका हेक्टर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. सुरुवातीपासून ठिबक सिंचन,…

Read More

व्यसनमुक्त, मूल्याधिष्ठित नागरिक घडणे गरजेचे:डॉ. डोनिका रूपारेल यांचे प्रतिपादन, ब्रह्माकुमारीजच्या नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाचा शुभारंभ‎

व्यक्ती बदलली तर कुटुंब बदलते, कुटुंब बदलले तर समाज बदलतो आणि समाज बदलला तर राष्ट्र बदलते, असे सांगत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी केवळ आर्थिक प्रगती पुरेशी नसून व्यसनमुक्त, निरोगी, चारित्र्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक घडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ब्र.कु. डॉ. डोनिका दीदी रूपारेल यांनी केले. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि प्रजापिता…

Read More