माहीममध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार:फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात, साथीदाराचा शोध सुरू
माहीम परिसरात शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला बाईकवरून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने या विकृत कृत्याचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला गप्प राहण्यास भाग पाडले होते. याप्रकरणी माहीम पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याची रवानगी…