सेवानिवृत्त कर्मचारी विद्यापीठाचे खरे मार्गदर्शक- कुलगुरु बारहाते:निवृत्त कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा, पत्नींचाही केला सन्मान
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा विद्यापीठाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळा कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, कार्यकारी अभियंता श…