Headlines

BJP Leader Vijay Chaudhari PA Arrested In Raksha Khadse Controversy

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा आरोप असलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. भाजप नेते विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी पोलिसांनी पहिली मोठी कारवाई करत त्यांचे . गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते विजय चौधरी यांच्या नावाशी संबंधित अनेक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत…

Read More

शिर्डीत दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड:मुद्देमाल केला जप्त

शिर्डी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत रेल्वे ट्रॅकजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून तलवार, दोन चाकू, मिरचीपूड, कटावणी, नायलॉन दोरी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा सुमारे १७ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस…

Read More

धार्मिक:ग्रामदैवत अकलाई देवीची भंडाऱ्यासह दहीभाताच्या नैवेद्यानंतर झाली महापूजा

अकलूजचे ग्रामदैवत श्री अकलाई देवीचा पारंपरिक भंडारा (यात्रा) शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. यात्रेनिमित्त अकलूजसह परिसरातील हजारो देवीभक्तांनी दिवसभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. महापूजा, पालखी सोहळा, आरती, महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. श्री अकलाई देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आषाढी पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी भंडारा (यात्रा)…

Read More

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:नाशिक-पुणे घाटमाथ्याला ऑरेंज, तर 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून पुढील काही दिवसही जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाची तीव्रता वाढली असून अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. आज नाशिक आणि पुणे घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून कोकण आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, नंदुरबार,…

Read More

5 मिनिटांत अर्धा किलो सोने लंपास:बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्समध्ये लूट; व्यावसायिकांमध्ये दहशत‎

दर्यापूर शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात शुक्रवारी (दि. ३१) रात्री आठ वाजता थरारक दरोड्याने हादरला. भरवस्तीतील माहोरे ज्वेलर्समध्ये चार सशस्त्र लुटारुंनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत अवघ्या पाच मिनिटांत सुमारे अर्धा किलो सोने आणि तब्बल १३ किलो चांदी लंपास करुन पोबारा ठोकला. या दागिन्यांची किंमत सुमारे १ कोटी रुपयांच्या आसपास आहे. या सशस्त्र लुटीमुळे संपूर्ण शहरात…

Read More

70 वर्षानंतर खामगावात 24 तासात 146 मिमी. पाऊस:अंडरपासमध्ये 15 फूट पाणी

सात दशकाच्या कालखंडानंतर शहरात प्रथमच ३१ जुलैच्या सकाळी आठ वाजेपर्यंत १४६.२मिलिमीटर अर्थात सहा इंचाच्यावर पाऊस बरसला आहे या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते आणि गेल्या दोन दिवसापासून शहरवासीयांना सूर्यदर्शन झाले नाही या पावसामुळे शहरातील खोलगट भागात व अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. तसेच साईनगर कडे जाणाऱ्या रेल्वे मार्गाखालील भुयारी…

Read More

महिलांची फसवणूक करणारी टोळी 12 तासांत जेरबंद:5 आरोपी अटक, 5.40 लाखांचा मुद्देमाल जप्त; बनावट सोन्याच्या बिस्किटांचा सापळा उधळला‎

महिलांना बनावट सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा अहमदपूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पर्दाफाश केला. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून बनावट सोन्याची चार बिस्किटे, एक कार आणि चोरीस गेलेले सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी…

Read More

श्रीगोंद्यात पावसाची उघडीप, पिकांच्या खुरपणीने घेतला वेग:तालुक्यातील विहीरींच्या पाणी पातळीत वाढ न झाल्याने शेतकरी वर्गात मात्र चिंता‎

तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी ढगाळ वातावरण कायम असल्याने पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाच्या उघडिपीचा फायदा घेत शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या खुरपणीच्या कामांना वेग दिला असून सध्या शेतशिवारात मजुरांसह शेतकरी खुरपणी करताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यंदाच्या हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरी, मूग, उडीद, तूर, मका, कपाशी, कांदा तसेच…

Read More

अकोले नगरपंचायत निवडणूक:पिचडांच्या बालेकिल्ल्यात बंड यशस्वी; "कमळ विरुद्ध कमळ' लढतीत नाईकवाडींची बाजी

अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी भाजपमध्येच ‘कमळ विरुद्ध कमळ’ अशी प्रतिष्ठेची लढत रंगली. माजी नगराध्यक्ष सोनाली लक्ष्मीकांत नाईकवाडी यांनी आवाजी मतदानातून ११ मते मिळवत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार वैभव पिचड पुरस्कृत उमेदवार वैष्णवी सोमेश्वर धुमाळ यांचा ११-६ अशा पाच मतांच्या फरकाने पराभव केला. या निकालामुळे अकोले भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली…

Read More

'चक्काजाम':नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी 9 ऑगस्टला चक्काजाम आंदोलन : आ.सत्यजित तांबे

नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठीचा लढा आता अधिक तीव्र होणार असून, आगामी ९ ऑगस्ट रोजी (क्रांती दिन) सकाळी ९ वाजता नाशिक–पुणे महामार्गावरील विविध ठिकाणी एकाच वेळी ‘चक्काजाम’ जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. केंद्र सरकारचे या महत्त्वपूर्ण प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार तांबे म्हणाले,…

Read More