Headlines

सातारा जिल्ह्यात पावसाची शंभरी पार:सरासरीच्या 103.4 टक्के पर्जन्यवृष्टी; सातारा, पाटण व माण तालुके अजूनही सरासरीच्या प्रतिक्षेत

जुलै महिन्याच्या अखेरीस सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन करत समाधानकारक हजेरी लावली आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ५१८.३ मिमी पावसाची नोंद झाली असून, ती सरासरीच्या १०३.४ टक्के आहे. केवळ ३१ जुलै रोजी जिल्ह्यात २८ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांसह धरणांच्या पाणीसाठ्याबाबत दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात खंडाळा…

Read More

सातारा क्राईम जगत:शोषखड्यात पडून साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा अंत; घराचे कुलूप तोडून दागिन्यांवर डल्ला

सातारा तालुक्यातील लिंब आवळीमाथा येथे घराशेजारी असलेल्या शोषखड्यात पडून साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. ३०) दुपारी घडली. या घटनेमुळे बेलवडे व लिंब आवळीमाथा परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष स्वप्नील लोंढे (वय ३ वर्षे ६ महिने, रा. बेलवडे, ता. जि. सातारा) हा आपल्या चुलत आजोबांच्या घरी लिंब आवळीमाथा…

Read More

कामावरून परतताना काळाचा घाला:भरधाव कार खड्ड्यात आदळून उलटली; दोघे ठार, एक गंभीर जखमी; करंजाळाजवळील घटना

औंढा नागनाथ ते हट्टा मार्गावर करंजाळा पाटी जवळ भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ता. ३१ सायंकाळी घडली आहे. अपघातातील दोन्ही मृतदेह औढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील ओमकार गिऱ्हे (२७) श्रीधर ढेगळे (३३…

Read More

Kishor Shitole Slams Abhijeet Deepke Over Paper Leak Controversy

अभिजीत दीपके आंदोलनादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप करत आहेत. जर तसे असेल आणि दिल्ली पोलिस संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करत असतील, तर त्या कारवाईला विरोध करण्याचे कारण काय? असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे . आंदोलनादरम्यान पोलिस कर्मचारी आणि पत्रकारांवर झालेले हल्ले, दगडफेक आणि हिंसाचार हे गंभीर स्वरूपाचे असून, त्याबाबत कठोर कारवाई…

Read More

बी. जे. मेडिकलचा विद्यार्थी बेपत्ता:रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून वसतिगृह सोडल्याचा कुटुंबीयांचा आरोप, समिती स्थापन

पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी तन्मय वंगे गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता आहे. रॅगिंगच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्याने वसतिगृह सोडल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून महाविद्यालय प्रशासनाने चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती नेमली आहे. तन्मयचे वडील अजयकुमार वंगे यांनी पोलीस आणि महाविद्यालय प्रशासनाकडे लेखी…

Read More

यवतमाळमध्ये हृदयद्रावक घटना:पुरात कार वाहून गेल्याने आईसह दोन मुलींचा करुण अंत, झाडाचा आधार घेतल्याने पती बचावले

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील दहेली गावाजवळून वाहणाऱ्या कुपटी नदीला आलेल्या पुरात कार वाहून गेल्याची एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. पुराच्या पाण्यातून जीवघेणे धाडस करत वाहन पुढे नेण्याचा निर्णय या कुटुंबाच्या जीवावर बेतला असून, या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या आईसह तिच्या दोन मुलींचे मृतदेह शोधण्यात अखेर बचाव पथकाला यश आले आहे. या घटनेची माहिती…

Read More

पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेविकेचे पाद्यपूजन:प्रकारावरून वाद, 'आप'कडून चौकशीची मागणी

पुणे महानगरपालिकेच्या एका शाळेत गुरु पौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांकडून भाजपच्या नगरसेविका स्वाती लोखंडे यांचे पाद्यपूजन करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरांतून टीका होत असून, आम आदमी पार्टीच्या (आप) पालक युनियनने या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. शाळेत आयोजित गुरु पौर्णिमा कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नगरसेविका स्वाती…

Read More

वसमत उपनगराध्यक्षावर गोवंश कत्तलीचा गुन्हा दाखल करा:सकल हिंदू समाजाची मागणी, वसमत बंदला मोठा प्रतिसाद

वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन शिवारातील शेतात कत्तलीसाठी ठेवण्यात आलेल्या १९ गोवंश प्रकरणात राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षावर गोवंश कत्तलीचा गुन्हा दाखल करून मोकाका लावावा या मागणीसाठी शुक्रवारी ता. ३१ पुकारण्यात आलेल्या वसमत बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी महसूल प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन शिवारातील शेतात वसमत ग्रामीण पोलिसांच्या पथकाने बुधवारी ता. २९ छापा…

Read More

खामगावच्या आदिवासी आश्रम शाळेत उभारले अत्याधुनिक क्रीडा संकुल:सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांच्या हस्ते होणार उद्घाटन

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम शाळेत अमनोरा येस फाउंडेशनने उभारलेल्या अत्याधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. अमनोरा येस फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सिटी ग्रुपचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या संकुलामध्ये व्हॉलीबॉल, हँडबॉल आणि बास्केटबॉलसाठी स्वतंत्र…

Read More

पुण्यात अतिवृष्टी, धरणांतून पाण्याचा मोठा विसर्ग:नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, पाणी पातळी वाढण्याची शक्यता

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे खडकवासला, निरा देवघर, भामा आसखेड आणि पानशेत या चार प्रमुख धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग शुक्रवारी सकाळी…

Read More