मध्यरात्रीपासून दुपारपर्यंत रिपरिप:पाऊस सरासरीच्या 50 टक्क्यांवर
जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १४.३ मिमी पाऊस झाला असून, १ जूनपासून आजपर्यंत एकूण २२७.४ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्याने आतापर्यंत मोसमी सरासरीच्या ५० टक्क्यांहून अधिक टप्पा ओलांडला. जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत कायम…