Headlines

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचे समन्स:2009 सालच्या व्हिडीओ प्रकरणी 5-6 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश; काय आहे प्रकरण?

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावले असून, त्यांना येत्या ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे समन्स २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील एका जुन्या आणि बहुचर्चित प्रकरणाशी संबंधित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांनी एका वादग्रस्त व्हिडीओप्रकरणी हा खटला दाखल केला होता. तक्रारदार (वसंत डावखरे) हयात…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:‘कॅग’चा ठपका : देशातील 127 प्रकरणांत ‘पॅन’ न तपासता 40 हजार कोटींची कर्जमाफी, बँकांची चलाखी

देशातील बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांनी आयकर विभागाच्या डोळ्यांत धूळफेक करत तब्बल ७४,७६६.३९ कोटींचा कर बुडवला आहे. मुंबईच्या एका प्रकरणात तर बोगस ‘पॅन’च्या आधारे ११५.६१ कोटींच्या थकीत कर्जावर करसवलतही मिळवली. एवढेच नव्हे, तर देशातील १२७ प्रकरणांत बँका आणि वित्तीय संस्थांनी आधी कर्जदारांचा ‘पॅन’ न घेता ४० हजार कोटींचे बुडलेले कर्जे राइट-ऑफ केले. त्यानंतर आयकर…

Read More

हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल:भूसंपादन आदेशांवर सह्या; तत्कालीन‎ जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना जामीन नाही‎

बीड भूसंपादन लवाद प्रकरणातील ३१० कोटींच्या बनावट ‎‎आणि मागील तारखेच्या (बॅकडेटेड) आदेशांवर स्वतः ‎‎‎अविनाश पाठक यांच्याच स्वाक्षऱ्या ‎‎‎असल्याचे हस्ताक्षर तज्ज्ञांच्या ‎‎‎अहवालातून स्पष्ट झाले आहे. या‎‎गुन्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचा‎‎थेट आणि सक्रिय सहभाग सिद्ध‎‎झाल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च ‎‎‎न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ‎‎‎न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनी‎जामीन देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे पाठक‎यांच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला असून, ७‎मेपासून न्यायालयीन…

Read More

विनापरवाना टॅक्सीसेवा देणाऱ्या ‘रॅपिडो’च्या संस्थापकांवर गुन्हा:आरटीओने डमी राइडद्वारे केले स्टिंग ऑपरेशन

शहरात बेकायदा धावणाऱ्या ‘रॅपिडो’ बाइक टॅक्सी कंपनीविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोठा दणका दिला आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही विनापरवाना ॲपद्वारे प्रवासी वाहतूक सुरू ठेवून शासनाची व प्रवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी रॅपिडोचे संस्थापक, संचालकांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटार वाहन निरीक्षक अभिजित अण्णासाहेब जगनाडे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात…

Read More

पिकअपच्या धडकेमध्ये दुचाकीस्वार ठार:6 महिन्यात 525 अपघाती मृत्यू‎

भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवून पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ६५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना १८ जुलै रोजी दुपारी दीड ते तीन वाजेच्या सुमारास दौंड-नगर रोडवरील हिंदुस्थान कारखान्यासमोर घडली. मारुती गोविंद शिंदे (वय ६५) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे भाऊ प्रभाकर गोविंद शिंदे (वय…

Read More

संतापात भर:खड्डे, उदासीन यंत्रणेने चौथा बळी घेतलाच, अंबड-सातपूर लिंकरोडवर दुसरी घटना, ठेकेदार मात्र मोकाट

शहरातील खड्ड्यांनी आणि उदासीन यंत्रणेने अखेर चाैथ्या निष्पाप नाशिककराचा बळी घेतलाच. अंबड एमआयडीसीतील एक्स्लो पॉईंट भागात चिखल आणि खड्ड्यामुळे नीलेश प्रल्हाद कोतकर (४०) या तरुण व्यावसायिकाचा अपघाती मृत्यू झाला. यंदाच्या पावसाळ्यात खड्ड्यांमुळे झालेला हा चौथा मृत्यू असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात राेष वाढला आहे. एकीकडे रस्त्यांवर मुरुमाऐवजी माती टाकून ठेकेदार महापालिकेच्या डाेळ्यात ‘मातीफेक’ करत आहेत,…

Read More

शेवगावात बेसुमार वृक्षतोडीने पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात:सागवानाच्या लाकडाचीही होतेय वाहतूक, वनविभागाचे मात्र दुर्लक्ष‎

एकीकडे शासन स्तरावर मोठ्या थाटामाटात वृक्षारोपणाची उद्दिष्टे निश्चित करून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे प्रत्यक्ष शेवगाव परिसरात मात्र मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. वनविभागाचे दुर्लक्ष, गस्तीचा अभाव आणि सागवान लाकडाची दिवसाढवळ्या होणारी वाहतूक यामुळे वनविभागाच्या एकूणच कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ​पावसाळा हा झाडे, वेली आणि…

Read More

जायकवाडी:धरणामधील जलसाठा 67.60 टक्क्यांवर

नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गात घट झाल्याने जायकवाडी धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. बुधवारी (२९ जुलै) रात्री ९ वाजेपर्यंत जायकवाडी धरणात २० हजार ६८६ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. या आवकीमुळे धरणातील उपयुक्त जिवंत पाणीसाठा ६७.६० टक्क्यांवर पोहोचला असून, सध्या ५१.६० टीएमसी (१४६१.३१६ दशलक्ष घनमीटर) इतका जिवंत पाणीसाठा जमा झाला…

Read More

गुरुपौर्णिमा:श्री मोहटादेवी विद्यालय येथे गुरुपौर्णिमा साजरी

भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या सचिव वंदनाताई मुखेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. धनंजय मुखेकर यांच्या प्रेरणेतून म्हारोळा येथील श्री मोहटादेवी विद्यालय व कै विठ्ठलराव धरपळे कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. अशोकराव मुखेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी काही निवडक विद्यार्थ्यांची…

Read More

जायकवाडीवर अवलंबित 25 हजार पांरपरिक मच्छीमारांचे होणार सर्वेक्षण:रोजगाराचा मार्ग मोकळा होणार‎

जायकवाडी धरणावर पिढ्यान्पिढ्या मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या पारंपरिक मच्छीमार कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. जलाशयावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या कहार, भोई आणि भिल्ल समाजातील मच्छीमार कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना विविध सरकारी रोजगाराभिमुख योजनांशी जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जायकवाडी मच्छीमार बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नगरसेवक बजरंग लिंबोरे…

Read More