Headlines

बुलेट ट्रेनसाठी ठाणे खाडीत खोदकाम सुरू:7 किलोमीटरचा मार्ग जाणार पाण्याखालून, भारतातील पहिला खाडीखालचा रेल्वे बोगदा

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता जबरदस्त वेग मिळाला असून, देशातील पहिल्या खाडीखालच्या रेल्वे बोगद्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. ठाण्याच्या खाडीमध्ये एका भल्या मोठ्या टनेल बोरिंग मशीनने हे खोदकाम सुरू केले आहे. विशेष म्हणजे, भारतात पहिल्यांदाच पाण्याखालील बोगद्यात रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार असल्याने या प्रकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. बुलेट ट्रेनसाठी आता…

Read More

मुंबई कोस्टल रोडवर 'पोर्शे'चा भीषण अपघात:भरधाव वेगात दुभाजकाला धडक, कारचा पुढचा भाग चक्काचूर; एअरबॅगमुळे दोघांचे वाचले प्राण

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडवर रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. एका भरधाव पोर्शे या लक्झरी स्पोर्ट्स कारचा ताबा सुटल्याने ती थेट रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, या भीषण अपघातात एक मोठी दैवी किमाया पाहायला मिळाली. कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे चालक आणि…

Read More

मतदार यादीपूर्ण करा, कर्जमाफी वीज माफीचे आश्वासन सरकारने पाळले:राहुरीच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे प्रतिपादन‎

विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम यशस्वी करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. ही केवळ प्रशासनाची मोहीम नसून, मतदार यादी त्रुटीरहित करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. या कामात निष्काळजीपणा केल्यास मतदारांचे नाव कमी होऊ शक . मंत्री विखे पाटील यांनी महायुती सरकारच्या निर्णयांचा पाढा वाचला. ते म्हणाले, शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी मिळाली असून जुलैअखेर रकमा…

Read More

बुद्धीबळ स्पर्धेत देशातील 380 खेळाडूंचा सहभाग:बुद्धीबळाच्या पटावर रंगतोय शह काटशहाचा खेळ, खेळाडूंचा सहभाग‎

अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नरेंद्र फिरोदिया चषक अखिल भारतीय क्लासिक आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे नुकतेच उद्घाटन झाले. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे सुरू झालेल्या या तीन दिवसीय स्पर्धेचे उद . प्रास्ताविकात बापट म्हणाले, या स्पर्धेसाठी आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, बिहार, जम्मू-काश्मीर तसेच महाराष्ट्र राज्यातून ३८०…

Read More

नांदेडच्या भाविकाकडून सव्वा लाख वारकऱ्यांना महाप्रसाद:रामीतवार अन् पोकलवार कुटुंबाची सेवा; 100 क्विंटल ज्वारीच्या भाकऱ्या अन् पिठलं-ठेचा असा घरगुती बेत

. आषाढी वारी म्हणजे भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अनोखा संगम. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना घरच्या जेवणाचा आस्वाद मिळावा या उदात्त भावनेतून नांदेड येथील रहिवासी भारत रामीतवार व त्यांचे जावई पंकज पोकलवार यांचे कुटुंब गेली तब्बल १५ वर्षे अखंडपणे अन्नदानाची सेवा बजावत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा नातेपुते येथे दि. १९ जुलै…

Read More

रावगावामध्ये ढोल-ताशांचा गजर निवृत्तीनाथांच्या पालखीचे स्वागत:300 किमी पायी प्रवास केला पूर्ण; उंट, जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी‎

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून २० दिवसांमध्ये सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करत संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू संतश्रेष्ठ श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी शनिवारी एक लाखांहून अधिक वारकऱ्यांसह सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. जिल्ह्याच्या सीमेवरील करमाळा तालुक्यातील रावगाव येथे पालखीचे अत्यंत भक्तिमय वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होताच रांगोळीच्या पायघड्या, ढोल-ताशांचा…

Read More

उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाचे अमरावती शहरात तीव्र पडसाद:भाजपचा सुंदरकांड, नवनीत राणा यांचे हनुमान चालीसा पठण‎

अयोध्येचे राम मंदिर आणि इतर तिर्थस्थळांच्या ठिकाणी झालेल्या भ्रष्टाचार, चोरीकडे लक्ष वेधण्यासाठी माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, शनिवारी नागपूर येथे रामरक्षा आंदोलन केले. या आंदोलनाचे पडसाद अमरावतीतही उमटले. उद्धव ठाकरे यांनी केव्हाच हिंदुत्व सोडले म्हणत अमरावतीत भाजपने राजकमल चौकात सुंदरकांड केला. तर भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी हनुमानगढी येथे हनुमान चालिसा…

Read More

अनित्य, दुःख आणि अनात्म या तत्त्वांचे चिंतन आवश्यक:शीलवंशलंकार यांचे प्रतिपादन स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण‎

आसक्तीचा त्याग करून अनित्य, दुःख आणि अनात्म या तत्त्वांचे चिंतन करणे आवश्यक आहे. जेव्हा प्रियभाव आणि आसक्तीचा अतिरेक कमी होतो, तेव्हा शोक आणि भय यांचाही अंत होतो, असे प्रतिपादन भन्ते शीलवंशलंकार यांनी केले. . अंकुर बनसोड यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील बुद्ध टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून भिक्खू सीलवंसलंकार, मनपाच्या माजी…

Read More

चिमुरड्यांच्या जीवाशी खेळ:अंगणवाडीच्या आहार पाकिटात मृत पक्षी…, नाशिक जिल्ह्यात देवगावातील धक्कादायक प्रकार

शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत लहान बालके, गर्भवती व स्तनदा मातांना पोषण आहाराच्या माध्यमातून सकस आहार उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र, निफाड-1 प्रकल्पांतर्गत देवगाव बिट क्र. 2 मधील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रातून वितरित केलेल्या पोषण आहार पाकिटात कुजलेला मृत पक्षी आढळल्याचा आरोप लाभार्थीने केला आहे. या घटनेने लाभार्थी पालकांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणाबाबत…

Read More

सहकार भारतीचे बळ देण्याचे कार्य:मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकारिणीचे गठण‎

भ्रष्टाचार व घराणेशाहीमुळेच सहकार चळवळ नासली व जनसामान्यांच्या उन्नतीचा मार्ग अवरुद्ध झाला आहे. त्यामुळे सहकाराला प्रामाणिक संस्काराचे बळ देण्याचे काम सहकार भारती करत आहे, असे प्रतिपादन सहकार भारती अकोला जिल्हाध्यक्ष रामेश्वर फुंडकर यांनी केले. अकोला अर्बन बँकेत आयोजित सहकार भारतीच्या सभेत अध्यक्षीय विचार मांडताना ते बोलत होते. यावेळी सहकार भारती जिल्हा महामंत्री जैनेंद्र लुंकड, विधी…

Read More