Headlines

फत्तेपूर आठवडे बाजारातील विक्रेत्यांचे रस्त्यावर अतिक्रमण:अपघाताचा धोका, राज्य मार्गावर विळखा, पोलिस प्रशासनासह ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष‎

फत्तेपूर आठवडे बाजारातील व्यावसायिक थेट राज्य मार्गावर अतिक्रमण करू लागले आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून वाहनचालक त्रस्त होत आहेत. त्यासोबत अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. या कोंडीकडे पोलिस प्रशासनासह ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल् . फत्तेपूर आठवडे बाजारातील दुकानांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आठवडे बाजाराची जागा मात्र पुरेशी नसल्याने व्यावसायिक जामनेर धामणगाव राज्य मार्गावर…

Read More

लासूर स्टेशन परिसरात पिके उगवली; शेतकरी कोळपणीच्या कामात व्यग्र

लासूरगाव, लासूर स्टेशन, सावंगी, देवळी, माळीवाडगाव, डोणगाव परिसरात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या कोळपणी व तण नियंत्रणाच्या कामांना वेग दिल्याने शेतीशिवारामध्ये हे चित्र दिसून येत आहे. मागील आठवडाभर झालेल्या संततधार रिमझिम पावसामुळे शेतांमध्ये कापूस, मका, तूर, मूग व भुईमूग या पिकांसोबत मोठ्या प्रमाणात तण वाढले होते. मात्र गुरुवारपासून सोमवारपर्यंत पावसाने…

Read More

पिसाळलेल्या कुत्र्याचा उंडणगावात धुमाकूळ:चौघांसह रेड्याला चावा, रेबीज लस उपलब्ध नसल्याने जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवले‎

येथे पिसाळलेल्या कुत्र्याने सोमवारी अक्षरशः धुमाकूळ घालत पाच नागरिकांसह एका म्हशीच्या रेड्यावर हल्ला केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत कमलबाई पाटील, बाळू नरवडे, नीलेश जैस्वाल, एकनाथ गव्हाणे हे जखमी झाले असून भगवतीवाडी येथील एका म्ह . जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, उंडणगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र, कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारे अत्यावश्यक रेबीज…

Read More

लासूर स्टेशन येथील आरोग्य केंद्रात जनआरोग्य कल्याण समितीची बैठक:बैठकीत ट्राॅमा केअर सुरू करण्याची नागरिकांनी केली मागणी‎

स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी जिल्हा परिषद सदस्या संगीता संदीप आमराव यांच्या अध्यक्षतेखाली जनआरोग्य कल्याण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि सर्व कर्मचाऱ्यांनी अनिवार्यपणे मुख्यालयी थांबूनच रुग्णांना चोवीस तास दर्जेदार सेवा द्यावी, अशा कडक सूचना या बैठकीत देण्यात आल्या. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष निवडीनंतर झालेली ही पहिलीच महत्त्वाची बैठक होती….

Read More

संभाजीनगरात 3 कोटींचे दूषित खाद्यतेल जप्त:संभाजीनगरसह पैठणच्या 2 कंपन्यांवर एफडीएची धाड, जुने डबे, गंजलेली यंत्रे अन् तेलावर घाणीचा थर

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शनिवारी (११ जुलै) शहरातील दोन नामांकित खाद्यतेल रिपॅकिंग आस्थापनांवर छापे टाकून तब्बल २ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०३ रुपयांचा साठा जप्त केला. पैठण रोडवरील गेवराई तांडा येथील मे. बागारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स (गट नं. ७२) आणि लक्ष् . ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या दोन्ही कंपन्यांचे परवाने प्रशासनाने तातडीने निलंबित केल्याची माहिती…

Read More

जुलै अर्धा संपला; महाराष्ट्रात आणखी 5 दिवस पावसाची दडी:लातूर, परभणी, यवतमाळसह सोलापुरातही मोठी तूट

राज्यात जुलै महिना अर्धा संपत आला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने राज्यात पुढील किमान पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता नाही, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली. यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव स्पष्ट दिसत असून, पावसाअभावी अनेक भागांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट…

Read More

Satara Police Security Plan for Palkhi Procession; 2700 Officers Deployed

संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. १५ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होणारी पालखी १८ जुलैपर्यंत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असून, या चार दिवसां . पालखी मार्ग, प्रमुख मुक्कामस्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या, पाकीटमारी तसेच महिलांशी गैरवर्तनाच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील डीबी पथकांसह विशेष गस्त…

Read More

अमरावतीत पाऊस सरासरीवरून 76 टक्क्यांवर घसरला:चार दिवसांत मान्सूनचा खंड; जलसाठे, पेरणी आणि व्यापाराला फटका

अमरावती जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावून सरासरी गाठली असली तरी, गेल्या चार दिवसांत पावसाचे प्रमाण पुन्हा सरासरीच्या ७६.६ टक्क्यांवर घसरले आहे. मान्सूनच्या या खंडामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, जलसाठे, पेरणी आणि स्थानिक व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.चार दिवसांपूर्वी जिल्ह्याचा पाऊस सरासरीच्या ९० टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतरच्या खंडामुळे तो सुमारे १५ टक्क्यांनी घटला आहे. पावसाने…

Read More

उर्गेन स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ऑलिम्पियाडमध्ये राज्यस्तरीय यश:रेयांशला तिसरा, मृण्मयीला सातवा क्रमांक; अबॅकसमध्येही प्राविण्य

अमरावती येथील महादेव खोरी स्थित उर्गेन संघरक्षित इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत राज्यस्तरीय उल्लेखनीय यश मिळवले आहे. इयत्ता पाचवीतील रेयांश धवळे याने तिसरा, तर इयत्ता नववीतील मृण्मयी उके हिने सातवा राज्यस्तरीय क्रमांक पटकावला. या दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडतर्फे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा…

Read More

मांजरीतील सराफी पेढीची भिंत फोडून चोरी:30 तोळे सोने, चांदी आणि रोकड लंपास; आरोपींचा शोध सुरू

मांजरी बुद्रुक येथील मुंढवा रोडवर असणाऱ्या म्हसोबा वस्ती परिसरात एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकून चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि मोठी रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी, १२ जुलै २०२६ च्या रात्री ही घरफोडी झाली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मांजरी…

Read More