Headlines

पुण्यात 19 जुलै रोजी इस्कॉनची जगन्नाथ रथयात्रा:स.प. महाविद्यालयापासून प्रारंभ, 1 लाख भाविकांना महाप्रसाद वाटप

पुणे शहरात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) पुणे यांच्यातर्फे रविवार, १९ जुलै रोजी जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयापासून या यात्रेला प्रारंभ होईल. ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेच्या धर्तीवर हा उत्सव पुण्यात साजरा केला जातो. इस्कॉन कात्रज-कोंढवा रस्त्यावरील मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांना या दिवशी विशेष…

Read More

नितीन गडकरींची इथेनॉलवरून सोशल मीडियावर बदनामी:युट्यूबर मनीष कश्यपसह चौघांवर गुन्हा दाखल

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याप्रकरणी बिहारच्या एका युट्यूबरला मोठा फटका बसला आहे. इथेनॉल निर्मितीच्या मुद्द्यावरून मंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी युट्यूबर मनीष कश्यपसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नागपूर सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी शिशिर त्रिपाठी, संपत पांडे आणि आदित्य जुमा यांनी…

Read More

पंढरपुरात 15 दिवस मटण-मांस विक्रीवर कडक बंदी:आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

आषाढी वारीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीत दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांच्या धार्मिक भावनांचा आदर करत, पंढरपूर शहर आणि नजीकच्या परिसरात १५ जुलै ते २९ जुलै असे सलग १५ दिवस मांस आणि मटण विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read More

Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray and Rahul Gandhi in Mumbai

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी सडकून टी . पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठळक मुद्दे… राहुल गांधींना प्रत्युत्तर: पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने…

Read More

महाराष्ट्रात बंदी असूनही गुटखा मिळतो कसा?:FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा खुलासा; दूध भेसळखोरांना जन्मठेपेचा इशारा

राज्यात गुटखा आणि भेसळयुक्त अन्नाचा सुळसुळाट रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत गुटखा माफियांची नवी कार्यपद्धती आणि राज्यातील दूध भेसळीच्या धक्कादायक वास्तवावर प्रकाश टाकला. “स्वतःचे आयुष्य स्वतः खराब करू नका, विष विकत घेऊ नका,” असे आवाहन करत त्यांनी माफिया…

Read More

केतन अग्रवाल हत्या प्रकरण:दोषींना कठोर शिक्षा द्या, प्रकरणाचा निकाल लवकर लावा, केतनच्या आईची पंतप्रधानांकडे न्यायासाठी साद

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि प्रकरणाचा निकाल विलंब न लावता लावावा, अशी मागणी केतनची आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे. मुलाच्या हत्येनंतर कुटुंबाला झालेल्या त्रासाची व्यथा त्यांनी पत्रातून मांडली आहे. राखी अग्रवाल यांनी पत्रात म्हटले आहे की, प्रत्येक आईप्रमाणे त्यांनाही आपला मुलगा संसार करताना…

Read More

त्या लहान बाळाच्या प्राणाची किंमत फक्त 7 लाख?:चेंबूर दुर्घटनेवरून महापौर म्हणाल्या- चौकशी अहवाल मान्य नाही, मनसेचीही आक्रमक भूमिका

चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड पडून झालेल्या एका लहान मुलाच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) दोन सदस्यीय चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालावरून आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अहवालात प्रशासकीय अधिकाऱ्यांची (विशेषतः उद्यान विभागाची) जबाबदारी झटकून केवळ कंत्राटदार आणि सल्लागारांना दंड ठोठावण्यात आल्याने, मुंबईच्या महापौर…

Read More

दूध भेसळ प्रकरणावरून जयंत पाटील-सुरेश धस आमनेसामने:जयंत पाटलांनी माझ्या नादी लागू नये, उलटा फिरलो तर सोडणार नाही- धस

जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये, मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला नीट सोडणार नाही.मी सहज डिवचायचा माणूस नाही. तुमची दादागिरी आणि नौटंकी तिकडे चालवायची, इकडे नाही. तुम्हाला पाहून इतर लोक गप्प बसत असतील, पण आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा भाजप आमदार सुरेश धस यांनी जयंत पाटील यांना दिला आहे. आमदार सुरेश धस…

Read More

अयोध्या मंदिर दानपेटी चोरीत 3 कोटींपर्यंत अपहार:कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांचा दावा; राजीनाम्याच्या चर्चा फेटाळल्या

अयोध्या राम मंदिरातील दानपेटीतून झालेल्या चोरीप्रकरणी अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या मते, या चोरीत सुमारे तीन कोटी रुपयांपर्यंतचा अपहार झाला असावा. मोठ्या प्रमाणात सोने, चांदीचे दागिने आणि रक्कम चोरीला गेल्याचे दावे चुकीचे असून, याबाबत ‘पराचा कावळा’ केला जात असल्याचे त्यांनी म्हटले. या चोरीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचेही त्यांनी…

Read More

राष्ट्रवादीत पुन्हा मोठ्या भूकंपाची नांदी?:शरद पवारांच्या 9 आमदारांचा 'NDA'कडे कल; जयंत पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ऐतिहासिक फुटीनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारही वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात विधान भवनात झालेल्या एका गुप्त बैठकीने या चर्चांना उधाण आणले आहे. आमदारांचा एनडीएसोबत जाण्याचा कल?…

Read More