Headlines

टीईटीला विरोध; 95 टक्के शाळांना टाळे:अमरावतीत 1500 शिक्षकांचा मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला साकडे

अमरावती जिल्ह्यात ९ जुलै रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित शाळा बंद राहिल्या. शिक्षक पात्रता चाचणीला (टीईटी) विरोध दर्शवण्यासाठी शिक्षकांनी सामूहिक रजा घेतल्याने जिल्ह्यातील ९५ टक्के शाळांना टाळे लागले. रजेवर असलेल्या शिक्षकांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात दीड हजाराहून अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला, ज्यात महिला शिक्षकांची संख्या लक्षणीय होती. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन…

Read More

पाणीपुरवठा पंपिंग उद्या सकाळी सुरू करा:दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, मनपा आयुक्त अमोल येडगे यांचे कडक निर्देश

छत्रपती संभाजीनगर येथे पाणीपुरवठ्याबाबत महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी कडक निर्देश दिले आहेत. उद्या सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठ्याची पंपिंग सुरू झालीच पाहिजे, असे त्यांनी संबंधित एजन्सी आणि अधिकाऱ्यांना बजावले. कामात कोणतीही दिरंगाई किंवा सबबी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. आज स्मार्ट सिटी कार्यालयात आयुक्त येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठ्याच्या…

Read More

पालखी प्रस्थाननंतर आळंदीत युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम:मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या माहितीनुसार निर्जंतुकीकरणही सुरू

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर, आळंदी नगरपरिषदेमार्फत संपूर्ण शहरात युद्धपातळीवर स्वच्छता व निर्जंतुकीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी ही माहिती दिली. पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नगर परिषदेने मध्यरात्रीच्या वेळेत साफसफाई, कचरा संकलन व वाहतुकीची कामे सातत्याने केली. दिंड्यांच्या मुक्कामाची ठिकाणे, जर्मन…

Read More

Aditya Thackeray, Bhaskar Jadhav Vs Atul Bhatkhalkar; Maharashtra Assembly Drama

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, आता त्यात पावसाच्या आणि पुराच्या मुद्द्यावरून प्रचंड ठिणगी पडली आहे. गेल्या चार-पाच दिवसांत मुंबई आणि उपनगरांसह वसई-विरार भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर . वसई-विरारमधील भीषण पूरस्थितीचा मुद्दा उपस्थित करत आमदार भास्कर जाधव यांनी सरकारला जाब विचारण्यास सुरुवात केली. “रहिवासी पुराच्या पाण्यात बुडाले आहेत, पण उत्तर…

Read More

पार्थ पवार मुंढवा जमीन प्रकरण:जमीन दस्त रद्द, 40 एकर सरकारी जमिनीच्या खरेदीचा व्यवहार न्यायालयाने नाकारला

पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळ्यातील खरेदीचा दस्त न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीचा मुंढवा येथील ४० एकर जमीन खरेदीचा हा दस्त रद्द झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात, पुण्यातील मुंढवा येथील सुमारे ४० एकर सरकारी मालकीची जमीन, जी बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला…

Read More

महापौर मंजुषा नागपुरे यांनी पालखी सोहळ्यांचे केले औक्षण:कळस आणि बोपोडी येथे वारकऱ्यांसोबत फुगडीचा आनंद घेतला

पुणे शहराने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे स्वागत केले. आषाढातील रिमझिम सरी, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात लाखो वारकरी पुण्यात दाखल झाले. महापौर मंजुषा नागपुरे यांनी कळस आणि बोपोडी येथे दोन्ही पालख्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. त्यांनी पादुकांचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महापौर नागपुरे यांनी टाळ-मृदुंगाच्या…

Read More

मिशन ॲडमिशन:जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू; विद्यार्थ्यांना 31 जुलैपर्यंत करता येणार अर्ज

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभागांतर्गत येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी (सत्र 2027-28) प्रवेश परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. ‘जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST-2027)’ ही शनिवार, दिनांक 28 नोव्हेंबर 2026 रोजी ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’मार्फत (CBSE) घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै…

Read More

पोलिस भरतीचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार:PSIसह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल, अटक न झाल्यास पीडितेचा धरणेचा इशारा

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या पोलिस दलातील कर्मचाऱ्यांकडूनच नागरिकांचे शोषण झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना बारामतीमध्ये उघडकीस आली आहे. पोलिस भरती तसेच ‘बँड्समन’ भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे आणि नोकरीत दाखल करण्याचे आमिष दाखवत एका महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी एका पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस कॉन्स्टेबलवर बारामती…

Read More

Aditya Thackeray Attacks Fadnavis; Ram Mandir Donation Box Theft Allegations

शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणापासून ते पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रण, महागाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान . राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा संदर्भ देत आदित्य ठाकरे म्हणाले, “जे लोक राम मंदिरालाही लुटू शकतात, दानपेटीही सोडत नाहीत, त्यांच्यासोबत…

Read More

नागपूरमध्ये भरणार 'ब्रिक्स' परिवहन मंत्र्यांची तिसरी बैठक:शाश्वत वाहतूक- AI तंत्रज्ञानावर 11 देशांचे प्रतिनिधी करणार मंथन

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे 11 आणि 12 जुलै 2026 रोजी ब्रिक्स परिवहन मंत्र्यांची तिसरी बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या ब्रिक्स 2026 अध्यक्षतेखाली होणाऱ्या या दोन दिवसीय बैठकीत सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी शाश्वत परिवहन व्यवस्था, पायाभूत सुविधांचा विकास आणि जागतिक संपर्क व्यवस्थेवर सखोल चर्चा करतील. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेची संकल्पना “लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य…

Read More