तिवस्यात उपवर्गीकरणाच्या विरोधात आंदोलकांचा एल्गार:सरकारचा तीव्र निषेध, प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणला
अनुसूचित जाती (एससी) या संवर्गात समाविष्ट असलेल्या ५९ जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज, मंगळवार, ३० जून रोजी तिवसा येथे एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक महिला-पुरुष रस्त्यावर उतरून सहभागी झाले. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाचा प्रारंभ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आला. आंदोलनाच्या अंतिम टप्प्यात…