Headlines

आरोग्य विभागात 4193 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या:आरोग्य संस्था बळकटीकरण करण्यासाठी रिक्त जागा भरण्यावर दिला भर

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रिया यंदा प्रथमच समुपदेशन पध्दतीने राबविण्यात आली असून कर्मचाऱ्यांच्या पसंतीक्रमानुसार त्यांना बदलीचे ठिकाण देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या समाधानासोबतच आरोग्य विभागाच्या बळकटीकरणासाठी रिक्तजागा भरण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यभरात झालेल्या ४१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच जिल्हास्तरावर पाठविण्यात आले आहे. राज्यात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या…

Read More

हिंगोलीत पाच दिवसांचे नवजात अर्भक काट्यात फेकले:पोलिसांच्या सतर्कतेने अर्भकास जिवदान, शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल

हिंगोली शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोरील निवासस्थानांच्या जवळ पाच दिवसांचे अर्भक सोमवारी ता. ८ दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास काट्यात फेकलेले आढळून आले. हिंगोली शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अर्भकाला काट्यातून बाहेर काढून शासकिय रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून नवजात अर्भक फेकणाऱ्या मातेचा शोध सुरु…

Read More

जागतिक महासागर दिन विशेष‎:महासागर खेचतोय मान्सूनचे ढग, पावसाची 8 टक्के तूट शक्य; 10 वर्षांत तिसऱ्यांदा कमी पाऊस‎

महासागरातील तापमानातील बदलानुसार‎पर्जन्यमानात मोठे बदल पहायला मिळतात.‎मागील दहा वर्षातील पर्जन्यमान पाहता,‎अहिल्यानगर जिल्ह्यात दर दोन ते चार‎वर्षांनी पर्जन्यमान कमी झाल्याचे दिसून‎येते. यापूर्वी २०२३ मध्ये कमी पाऊस झाला‎होता. आता पुन्हा २०२६ मध्ये पॅसिफिक‎महासागराचे तापमान‎ ०.५ अंशापेक्षा अधिक वाढल्याने,‎ एलनिनोचा प्रभाव निर्माण झाला. त्यामुळे‎ अहिल्यानगरसह भारतातील मान्सूनचे‎ ढग तिकडे ओढले जाऊन आठ ते दहा‎टक्के कमी पाऊस होण्याचा अंदाज‎…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा पुढे ढकलला:एनडीएच्या महत्त्वाच्या बैठकीमुळे तारखांमध्ये बदल, 10 ऐवजी 11 जूनला होणार!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यंदाचा 27 वा वर्धापन दिन एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला असून, आता हा सोहळा गुरुवार, 11 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबईतील किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. दरवर्षी 10 जून रोजी साजरा होणाऱ्या या पक्षीय सोहळ्याच्या तारखेत नवी दिल्लीत ‘एनडीए’ची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याने बदल करण्यात आला…

Read More

दादरमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात, CCTV फुटेज समोर:चालकाचे सुटले नियंत्रण, अनेक वाहनांना उडवले, एकाचा मृत्यू, तर अनेक जखमी

दादर येथील प्लाझा टॉकीज आणि कोतवाल उद्यान परिसरात आज सकाळी बेस्टच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बसने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू असून अनेक जण जखमी झाले आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस धारावीहून दादरच्या दिशेने येत होती. सकाळी…

Read More

परिवहन मंत्र्यांकडून बसस्थानकाची आकस्मिक पाहणी:अस्वच्छतेसह चालक-वाहक विश्रांतीगृहातील गैरसोयीवरून संतप्त,‎ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रविवारी ७ जूनला पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त शहरात आले होते. रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी अचानक शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देत पाहणी केली. या वेळी त्यांनी बस स्थानकातील स्वच्छता व्यवस्था, चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहाची स्थिती जाणून घेतली. बसस्थानकातील अस्वच्छता, चालक-वाहकांची गैरसोय या समस्यांवरून मंत्री सरनाईक संतप्त झाले. त्यांनी विभागीय वाहतूक…

Read More

नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटला!:भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांची माघार; जळगावचाही प्रश्न लवकरच सुटेल- गिरीश महाजन

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीला आता एक महत्त्वपूर्ण वळण मिळाले असून, महायुतीतील बंडखोरी शमवण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांना अखेर यश आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अधिकृत मुदत संपल्यानंतरही नेत्यांकडून युद्धपातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी निवडणुकीतून आपली माघार…

Read More

शेतकऱ्यांना हमीभावाचा मोठा दिलासा:महाराष्ट्राला 29.5 लाख क्विंटल अतिरिक्त धान खरेदीची मंजुरी; रब्बी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट थेट 89 लाख क्विंटलवर

राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रासाठी रब्बी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट केंद्र सरकारने तब्बल 29.5 लाख क्विंटलने वाढवून दिले आहे. यामुळे यंदाच्या हंगामातील एकूण धान खरेदीचे उद्दिष्ट 59.5 लाख क्विंटलवरून थेट 89 लाख क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती…

Read More

वाढती महागाईवरून काँग्रेस आक्रमक:काँग्रेसने चुलीकडून गॅसवर आणले, भाजपने देशाला पुन्हा चुलीकडे नेले- विजय वडेट्टीवार

देशातील सध्याच्या परिस्थितीवरून विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महागाईच्या विरोधात काही दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने नवी मुंबई येथे आंदोलन केले होते. त्यानंतर आता कॉंग्रेसनेही सरकारवर हल्लाबोल केला आहे. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले की, कॉंग्रेसने देशाला चुलीकडून गॅसकडे नेले, देशाला पुन्हा गॅसकडून चुलीकडे नेण्याचे काम…

Read More

मोहोळमधील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत:24 हजार हेक्टरवरील खरिपाची पेरणी खोळंबली‎, बियाणे विक्रेते हवालदिल

गतवर्षी मे च्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने सुरुवात करून शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला होता, गतवर्षी मे महिन्यात तालुक्यात २१३.१० मीमी पाऊस झाला होता. मात्र यावर्षी १ जून उजाडला तरी अद्याप पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांसह बियाणे विक्रेते हवालदिल झाले आहेत. गतवर्षी मे महिन्यातच वरून राजाने दमदार हजेरी लावत मोहोळ तालुक्यात शेतात पाणी पाणी केले होते. यंदा मात्र…

Read More