Headlines

महाराष्ट्राची विक्रमी झेप:सौर कृषिपंपांमध्ये महाराष्ट्राने गाठला देशात सर्वाधिक 10 लाखांचा टप्पा, एकूण सौर पंपांमध्ये 64 टक्के वाटा

सौर कृषिपंपामध्ये विश्वविक्रम करणाऱ्या महाराष्ट्राने बुधवारी (दि. ३) देशात सर्वाधिक १० लाख सौर कृषिपंपांचा टप्पा पूर्ण केला आणि देशपातळीवर एक नवा इतिहास रचला आहे. पीएम कुसुम-बी व मागेल त्याला सौर कृषिपंप अंतर्गत महाराष्ट्राने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशातील एकूण सौर कृषिपंपांपैकी तब्बल ६४ टक्के सौर पंप एकट्या महाराष्ट्रात कार्यान्वित झाले आहेत. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र…

Read More

निदा खान प्रकरणात माजी खासदार इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर:टीसीएस धर्मांतर प्रकरणाचा तपासात चौकशीची नोटीस येणार?

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या टीसीएस कंपनीतील कथित लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणाच्या तपासात आता आणखी एक महत्त्वाचे वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची विशेष तपास पथकाकडून आतापर्यंत 3 वेळा सखोल चौकशी करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या…

Read More

गोकुळ गितेंमुळे वाढली महायुतीची डोकेदुखी:जाहीर पाठींबा देण्यास स्पष्ट नकार; तोडगा काढण्यासाठी मंत्री उदय सामंत, महाजन नाशकात

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात गोकुळ गिते यांच्या बंडखोरीमुळे सत्ताधारी महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन व उदय सामंत नाशकात तळ ठोकून आहेत. हे दोन्ही नेते गोकुळ गिते यांचा जाहीर पाठींबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण गोकुळ गिते यांनी निवडणूक खूप पुढे गेल्याचे सांगत महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठींबा…

Read More

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीसाठी दिग्गज मैदानात:उबाठाचे अंबादास दानवे यांनी भरला उमेदवारी अर्ज

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, जिल्ह्यातील दिग्गजांनी थेट निवडणूक मैदानात उडी घेतली आहे. या हायव्होल्टेज निवडणुकीसाठी उबाठाचे आमदार अंबादास दानवे यांनी संचालक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, भाजप आणि महायुतीनेही या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. गुरुवारी (दि. 4) भाजपकडून राज्याचे…

Read More

संजय राऊतांकडे घोडेबाजाराचे पुरावे आहेत का?:शंभूराज देसाईंचा सवाल; ठाकरे गटात शिंदेंना मानणारे अनेक नेते असल्याचा दावा

सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा खासदार संजय राऊत यांचा आरोप जोरकसपणे फेटाळून लावला आहे. संजय राऊत यांच्याकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचे काही पुरावे आहेत का? संजय राऊत नेहमीच अशी मोठमोठी विधाने करतात. पण त्यांचे काहीही खरे होत नाही. त्यांनी आपल्या सवयीनुसार मोठ्या रकमेचे आकडे सांगितले….

Read More

संख्याबळ नाही म्हणून उमेदवारांनी माघार घेतली:मग पैसे घेतल्याचा आरोप कसा करता? संजय शिरसाट यांचा मविआला सवाल

संजय राऊत काँग्रेस-राष्ट्रवादीने सहकार्य केले नाही सांगत आहेत, संख्याबळ नसल्याने पराभव होणार हे सांगत आहेत. तरीही उमेदवारांनी माघार घेतली तर त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप राऊत कसे करू शकतात, असा सवाल शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ नाही त्यामुळे निवडणूक लढवण्यात काही अर्थ नाही हे उबाठाला काही…

Read More

पुण्यातील बडतर्फ महिला पोलिस सोनाली हिंगेंचा जामीन फेटाळला:'पॉक्सो'ची भीती दाखवत प्राचार्यांकडून वसूल केली होती खंडणी

अल्पवयीन मुलीचा वापर करून शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ‘पॉक्सो’ कायद्याची भीती दाखवत 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पुणे न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि बडतर्फ महिला पोलिस अंमलदार सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी फेटाळून लावला आहे. या गुन्ह्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे, छायाचित्रे,…

Read More

एका व्यक्तीची पदं गेली, दुसऱ्याचं राजकीय वजन वाढलं:तटकरे, चाकणकर आणि खरात प्रकरण; रोहित पवारांच्या वक्तव्याने नव्या चर्चा

शेकडो महिलांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात याच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. या प्रकरणाशी संबंधित काही छायाचित्रे आणि जुन्या संबंधांवरून अनेक राजकीय नेते चर्चेत आले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांनी सत्ताधारी आघाडीतील काही नेत्यांवर…

Read More

हिम्मत असेल तर राजीनाम्याची तयारी दाखवा- संधान:कोपरगावात सत्ताधाऱ्यांनी मांडला चार महिन्यांच्या कारभाराचा लेखाजोखा; विकासकामांचा वाचला पाढा‎

कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटाने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपल्या चार महिन्यांच्या कामकाजाचा लेखाजोखा जाहीर केला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांना चोख उत्तर देत राजीनाम्याचे खुले आव्हान दिले. नगराध्यक्ष संधान म्हणाले की, आम्ही सत्तेत आल्यानंतर आरोग्य सभापती…

Read More

योग, लाठी-काठी, पोवाडे, भजनांचे सादरीकरण करत जिंकली मने:दानापूर येथे सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप‎

श्री गुरुदेव सेवा मंडळ व दानापूर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला. गेल्या पाच वर्षांपासून नियमितपणे आयोजित होणाऱ्या या शिबिरात यंदा शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. समारोप कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मंगलाचरण, संकल्पगीत, स्वागतगीत, भजन, पोवाडे सादर केले….

Read More