Headlines

कॉकरोच जनता पार्टीवर मुनगंटीवारांचा निशाणा; आचारसंहितेलाही ठरवलं नवा गब्बरसिंग:सीजेपीच्या आंदोलनावरही स्पष्ट भूमिका

चंद्रपूरमध्ये बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर तसेच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर सविस्तर भाष्य केले. नीट परीक्षा प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे या पक्षाची चर्चा देशभर होत असताना मुनगंटीवार यांनी सामान्य नागरिकांच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमधूनच अशा प्रकारच्या चळवळी निर्माण होतात, असे मत व्यक्त केले….

Read More

निदा खान प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रभर:संभाजीनगरमधील कथित धर्मांतर प्रकरणावरून संजय शिरसाट आक्रमक, वडेट्टीवारांवर वेड्याच्या रुग्णालयात उपचार करण्याची वेळ

शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी विविध राजकीय घडामोडींवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अत्यंत तिखट शब्दांत प्रहार केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कथित धर्मांतर आणि फसवणुकीच्या प्रकरणाचा संदर्भ देत शिरसाट म्हणाले की, ‘निदा खान प्रकरण’ हे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहेत, हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे आणि आता…

Read More

कापरेवाडीत पर्यावरण रक्षणासाठी एकवटले शेकडो हात:कापरेवाडीमध्ये महाश्रमदान व वृक्षारोपणात ग्रामस्थांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग‎

“जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी पर्यावरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या काळात ‘पर्यावरण जगले तरच आपण जगू’ हे माणसाने वेळीच ओळखले पाहिजे. निसर्गाचे रक्षण करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे,” . यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना हभप अशोक महाराज बोंगाणे म्हणाले, “अध्यात्म, निसर्ग आणि विज्ञान या तीन गोष्टींचे…

Read More

मोदी सरकारने देश अमेरिका अन् दोन उद्योगपतींना विकला:मतदार यादीतून विशिष्ट समाजाची नावे वगळणे चुकीचे; 'एसआयआर' प्रक्रियेवर नाना पटोलेंचा आक्षेप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप ज्यांना घाबरतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. देशासाठी काम करणाऱ्या लोकांना नजरकैदेत ठेवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टींचे दिपके यांना चांगला पाठिंबा मिळत आहे, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. नाना पटोले म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी देश विकला आहे. आपला रुपया मारला आहे. मोदी सरकार आल्यानंतर रुपयाची किंमत…

Read More

शिवराज्याभिषेक हाच भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन:रायगडावरून संभाजीराजेंची भावनिक साद, 352 व्या सोहळ्यात मानाचा मुजरा

रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साहपूर्ण जल्लोष पाहायला मिळाला. देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवप्रेमी आणि शिवभक्त रायगडावर दाखल झाल्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. महाराजांच्या जयघोषाने गड दुमदुमून गेला असून विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी याच रायगडावर पार पडला होता….

Read More

विद्यार्थी वाहतूक यंदा सुकर, मागील वर्षीच्या तुलनेत 216 बसेसची वाढ:यंदाच्या वर्षी 1200 स्कूल बस गाड्यांना मिळाला परवाना‎

जिल्ह्यासह तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींना वेळेत स्कूलला पोहोचण्यासाठी मागील वर्षी ९८४ स्कूलबस गाड्यांनी परवाना घेतला होता. तर यंदाच्या वर्षी १२०० स्कूल बस गाड्यांनी परवाना घेतला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी २१६ स्कूल बस संख्येत वाढ झाली आहे. मात्र महाराष्ट्र मोटार कर अधिनियमानुसार खाजगी वाहनाकरिता २५०० रुपये प्रतिआसन प्रतिवर्ष इतका आहे, तर शाळेच्या मालकीची अथवा शाळेने…

Read More

विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तरावर!:आमचे उमेदवार विकले गेले, भाजपच्या नगरसेवकांनीही पैसे मागितले; वडेट्टीवारांचा आरोप

विधान परिषद निवडणुकीसाठी आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले. अनेक वेळेस बिनविरोध निवडणूक झाल्यात नाही झाल्या असे काही नाही. भाजपच्या नगरसेवकांनी सुद्धा पैसे मागितले आहेत, ते पैसे देणार कुठून? हा धंदा झालेला आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तरावरचे झाले…

Read More

भाजप सांगतो म्हणून देशातील विरोधी पक्ष संपणार नाही:नीट पेपरफुटी प्रकरणी गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा दिला पाहिजे- संजय राऊत

भाजप सांगतो म्हणून काही देशातील विरोधी पक्ष संपणार नाही. काही दिवसांनी लोकं सत्ताधाऱ्यांच्या मागे चपला घेऊन धावतील. त्यावेळी यांनाच वाटेल की जमीनीने आपल्याला सामावून घ्यावे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर इंडिआ आघाडीच्या बैठकीला सर्वच पक्षाचे नेते हजर राहणार आहेत, काही जण ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राऊत म्हणाले…

Read More

"सचिन उर्फ येडा''ची टीप दिल्याचा‎ संशय; मित्रांकडूनच तेजसचा खून:यवतमाळ‎ जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ; पाच महिन्यांत 30 खून अन् 47 खुनाचे प्रयत्न‎

शहरातील जामनकर नगर परिसरात ‎‎गुरुवारी दुपारी घडलेल्या तेजस ‎‎गायकवाड या तरुणाच्या ‎हत्याकांडाचा थरारक खुलासा ‎‎पोलिसांनी केला आहे. केवळ ‎‎संशयावरून मित्रांनीच मित्राचा ‎घरात घुसून निर्घृण खून केल्याची ‎‎धक्कादायक माहिती समोर आली ‎‎आहे. “सचिन उर्फ येडा” राठोड‎ याची टीप मारेकऱ्याला दिल्याचा‎ संशय आरोपींना होता. याच रागातून‎ हा थरकाप उडवणारा “गेम”‎ झाल्याचे उघड झाले आहे. या ‎घटनेमुळे यवतमाळ…

Read More

Matru Shakti procession on the occasion of Ahilyadevi Holkar Jayanti; Study class concluded

विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने शहरातील महेश भवन, जुना आरटीओ रोड येथे २८ ते ३१ मे या कालावधीत मातृशक्ती आयामचा प्रांतीय अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला होता. या वर्गात विदर्भ प्रांतातील २६ जिल्ह्यांमधून सुमारे २०० महिला पदाधिकाऱ्यांनी सहभाग . मलकापूर ग्रामपंचायत परिसरातून सुरू झालेली ही शोभायात्रा बसेरा कॉलनीमार्गे गायत्री बालिकाश्रमपर्यंत काढण्यात आली. गायत्री बालिकाश्रम…

Read More