Headlines

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आचरणात आणण्याची गरज:मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, महापौर ज्योती गाडे यांचे प्रतिपादन‎

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन लोककल्याणकारी आणि न्यायप्रिय असे रयतेचे राज्य निर्माण केले. समाजातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे, महिलांचा सन्मान राखणे, शेतकरी व कष्टकरी वर्गाला न्याय देणे तसेच सुशासन निर्माण करण . हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अहिल्यानगर मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून…

Read More

साई टेकडी परिसरातील तलावात 3 जण बुडाले:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही बुडाले

सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या ६ मित्रांपैकी तिघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. एका मित्राला पाण्यात बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर दोघेही पाण्यात ओढले गेले. अग्निशमन दल आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे दोघांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण सातारा परिसरावर तीव्र शोककळा पसरली आहे. मृत झालेली तिन्ही…

Read More

'कॉकरोच जनता पार्टी'चे दिल्लीत जोरदार आंदोलन:CM फडणवीसांची 'अराजकता' म्हणत टीका, तर ठाकरेंचा सरकारला इशारा

सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी तरुणांना आकर्षित करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आज देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर थेट रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले. या आंदोलनामुळे देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाला ‘अराजकता पसरवण्याची मानसिकता’ म्हटले आहे, तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख…

Read More

हिंगोलीत ठाकरे गटाचे 9 जूनला आक्रोश आंदोलन:संपूर्ण शेतकरी कर्जमाफी, शक्तीपीठ रद्द करावा यांसह इतर मागण्यांचा समावेश

राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासह इतर मागण्यांसाठी हिंगोली येथे ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी तारीख 9 सकाळी साडेदहा वाजता आक्रोश आंदोलन केले जाणार आहे. हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन केले जाणार आहे. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कोणत्याही अटी व शर्तींशिवाय करण्यात यावी तसेच संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना खत व…

Read More

जिल्हा बँकेच्या आखाड्यात सर्वपक्षीय दिग्गज:उमेदवारी मागे घेण्यासाठी महायुतीत रंगणार ओढाताण‎

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यात भाजप आणि शिंदेसेनेकडून सर्वाधिक अर्ज दाखल आहेत. त्यामुळे अर्ज छाननीनंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी सत्ताधारी पक्षांतच ओढाताण होण्याची चिन्हे आहेत. मागील दोन दिवसांत या निवडणुकीसाठी भाजपकडून मंत्री अतुल सावे, आमदार संजना जाधव, शहराध्यक्ष किशोर शितोळे, शिंदेसेनेकडून आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल…

Read More

श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचे संवर्धन करावे लागणार:झीज होत असल्याचा पुरातत्त्व सर्वेक्षणाचा अहवाल, पुढील आठवड्यात पाहणी करून अंतिम निर्णय

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूळ मूर्तींचे स्वरूप बदलू नये, तसेच संवर्धनाची प्रक्रिया दीर्घकाळ टिकावी, यासाठी पुरातत्त्व तज्ज्ञांकडून मूर्तींची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागामार्फत हे संवर्धन कार्य केले जाईल . श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संवर्धनासंदर्भात मंदिर समिती, सल्लागार परिषद, स्थानिक महाराज मंडळी आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक…

Read More

बॅलेट पेपर नाही, तर निवडणुकीवर बहिष्कार टाकावा:राज ठाकरेंची सूचना, उबाठासह सुप्रिया सुळेंचाही पाठिंबा; 8 जूनला दिल्लीत खलबते

राज्यात विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, आता ‘ईव्हीएम’ विरुद्ध ‘बॅलेट पेपर’ हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. जोपर्यंत निवडणुका बॅलेट पेपरवर होत नाहीत, तोपर्यंत थेट निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा विचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडला असून, या भूमिकेला आता महाविकास आघाडीतूनही मोठे बळ मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

Read More

राज्यात एआय, 5-जीमध्ये 4,080 कोटींची गुंतवणूक:पुणे, रायगडमध्ये प्रकल्प, 4750 रोजगार मिळणार

महाराष्ट्राला देशाचे आर्थिक इंजिन बनवण्याच्या दिशेने राज्य सरकारने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. राज्यात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि अत्याधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठी गुंतवणूक येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दोन सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून तब्बल ४,०८० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, ४,७५० तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. राज्य सरकारला…

Read More

चटका लावणारी एक्झिट:ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक भूषण देशमुख यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, इतिहासाचे अभ्यासक भूषण गोपाळ देशमुख (वय 64 ) यांचे आज निधन झाले. गेल्या महिन्यात भुईकोट किल्ल्यात हेरिटेज वॉक उपक्रमात लष्करी अधिकाऱ्यांच्या गटाला माहिती देत असताना त्यांना सर्पदंश झाला होता. त्यावर उपचार करण्यात आले. त्यातून बरे झाले होते. काही दिवसांनी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते….

Read More

भाविकांची गैरसोय:पैठण शहरामधील 8 नाल्यांचे पाणी गोदावरीच्या नदीपात्रात‎, विविध जिल्ह्यांतून दररोज 6 हजार भाविक येतात स्नानासाठी,

येथील गोदावरी नदीत अधिक मासानिमित्त पवित्र स्नानासाठी दररोज ५ ते सहा हजार भाविक येतात. मात्र, नदीपात्रात ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अधिक मासात गोदावरी स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने दररोज पाच हजार भाविक संत एकनाथ महाराज मंदिराच्या पाठीमागे, नागघाट आणि इतर घाटांवर स्नानासाठी येत आहेत. मात्र शहराच्या…

Read More