Headlines

साताऱ्यातून चालत होते अमेरिकन नागरिकांना गंडवणारे ‘सायबर जाळे’:17 जणांवर पोलिसांची कारवाई; बोगस कॉल सेंटर उध्वस्त

अमेरिकेतील नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून फसवून डॉलरमध्ये पैसे उकळणाऱ्या एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश सातारा पोलिसांनी केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील सुभाषनगर येथील एका अपार्टमेंटवर छापा टाकून १७ संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ३५ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यात रोख रक्कम, लॅपटॉप,…

Read More

अक्कलकोटवरून परतताना भाविकांवर काळाचा घाला:वर्ध्याजवळ कारची उभ्या ट्रकला धडक; दोन महिलांचा मृत्यू, 8 जण गंभीर

पंढरपूर आणि अक्कलकोट येथे देवदर्शन आटोपून अत्यंत आनंदाने नागपूरकडे परतणाऱ्या भाविकांवर काळाने भीषण घाला घातला आहे. तुळजापूर-नागपूर महामार्गावरील सालोड-नागठाणा परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ शनिवारी (२३ मे) पहाटेच्या सुमारास झालेल्या कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात नागपूरच्या दोन महिलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर ६ वर्षांच्या चिमुरड्या पाहुण्यासह एकूण आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्रभर ड्रायव्हिंग…

Read More

नांदेडमध्ये अवैध शस्त्र साठ्यावर धाड:470 तलवारींसह 703 शस्त्र जप्त, 14 लाखांचा मुद्देमाल ताब्यात; 15 दिवसात दुसरी कारवाई

नांदेड शहर दिवसेंदिवस अवैध शस्त्र विक्रीचा बाजार बनत असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज टाकलेल्या धाडीत तब्बल 703 अवैध शस्त्र जप्त करण्यात आली असून 14 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाईमुळे नांदेड शहरातील अवैध शस्त्र विक्रीचा बाजार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ग्रामीण पोलिसांनी 7 मे 2026 रोजी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 4…

Read More

Shirdi Missile Defence Complex Inauguration; CM Fadnavis Hails Aatmanirbhar Bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पाची प्रचिती आज शिर्डीत पाहायला मिळाली. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिर्डी येथे क्षेपणास्त्र संकुल (Missile Complex) आणि तोफगोळा उ . याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्राला स्वावलंबी बनवण्याची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे….

Read More

हिंगोली जिल्ह्यात १५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या:समुपदेशन पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील सुमारे १५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी ता २२ पारदर्शक आणि समुपदेशन पद्धतीने करण्यात आल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक निलाभ रोहन तसेच अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या उपस्थितीत ही बदली प्रक्रिया पार पडली. या बदली प्रक्रियेने कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे जिल्हा पोलिस दलातील सुमारे 900 कर्मचाऱ्यांपैकी एकाच पोलिस ठाण्यात मागील पाच…

Read More

राष्ट्रवादीबाबत वक्तव्याचा गैरअर्थ काढला:मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशाचे पालन करणार- मंत्री संजय शिरसाट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. महायुतीत कोणताही वाद निर्माण होईल अशी संधी देऊ नका, असे त्यांनी मला सांगितले आहे. मी त्यांच्या या आदेशाचे तंतोतंत पालन करेन. एकनाथ शिंदे हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी मला ‘सुनावले’ असा त्याचा अर्थ होत…

Read More

विदर्भातील शाळा 15 नव्हे 26 जूनपासून सुरू?:गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले संकेत; सूर्य असाच आग ओकत राहिला तर सरकार निर्णय घेणार

विदर्भात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. ही लाट 10 जूननंतर अशीच कायम राहिली तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकार विदर्भातील शाळा 15 जून ऐवजी 26 जूनपासून सुरू करण्यासंबंधी एखादा ठोस निर्णय घेऊ शकते, असे संकेत राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले आहेत. राज्यातील अनेक शहरांवर सध्या सूर्य आग ओकत आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हे शहर सध्या…

Read More

जायकवाडीत वर्षानंतर दुर्मिळ ‘शिलवर’ माशाची एन्ट्री:15 किलो वजनाचा गावरान मासा जाळ्यात, चवदार मांसामुळे बाजारात मोठी चर्चा

नाथसागर म्हणजेच जायकवाडी धरणातील मत्स्यसंपदेत पुन्हा एकदा दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या ‘शिलवर’ माशाची भर पडली आहे. तब्बल एक वर्षानंतर हा वैशिष्ट्यपूर्ण गावरान मासा मच्छीमारांच्या जाळ्यात आढळून आला असून, त्याचे वजन तब्बल 15 किलो आहे. धरणाच्या अथांग पाण्यातून सखाराम सुखदेव यांच्या जाळ्यात सापडलेल्या या अवाढव्य माशाची सध्या पैठण आणि परिसरातील मत्स्यप्रेमींमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. हा दुर्मिळ…

Read More

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक:जागा शिंदेसेनेची, पण राष्ट्रवादीच्या आमदार राजेश नवघरेंकडून थेट विजयाची घोषणा!

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीची जागा शिंदेसेनेकडे असून यावेळी नवीन चेहऱ्याला संधी मिळणार असल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही या जागेवर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी अन शिंदेसेनेत रस्सीखेच सुरु झाली आहे. परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी सुमारे 435 मतदार आहेत. मागील वेळी या निवडणुकीत बाहेरून आयात केलेले उमेदवार विप्लव बाजोरीया यांना उमेदवारी देण्यात आली…

Read More

मुंबईकरांनो सावधान पुढील 3 तासांत मुसळधार सरींची शक्यता:मुंबईसह कोकणात सतर्कतेचा इशारा; पुण्यात मेट्रोच्या कोचमध्ये गळती

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा प्रचंड कहर पाहायला मिळत असतानाच आता हवामानात अचानक बदल झाला आहे. मुंबईसह कोकणातील काही भागांत पुढील 3 तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 23 मे रोजी सकाळी 7 वाजता जारी करण्यात आलेल्या ‘नाऊकास्ट वॉर्निंग’मध्ये मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात…

Read More