पुण्यात कारच्या काचा फोडून चोऱ्या करणारा गुन्हेगार जेरबंद:12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; आरोपीवर 100 हून अधिक गुन्हे दाखल
पुण्यात कारच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अलंकार पोलिसांनी अटक केली आहे. राजू बाबूराव जवळकर (वय ५७, रा. डोणजे फाटा, ता. हवेली, जि. पुणे) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून १२ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तो रस्त्याच्या कडेला किंवा निर्जन ठिकाणी पार्क केलेल्या गाड्यांना लक्ष्य करत असे. अलंकार…