राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडी वाढल्या:पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; तिकडे परांजपे पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत उभयंतांत कोणती चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण त्यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यांची कथित नाराजी व पक्षाशी संबंधित इतर काही मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यातच सत्ताधारी…