Headlines

वरदडी येथील शनि मंदिरामध्ये पहाटे अभिषेक:जन्मोत्सव, सायंकाळी आरती, ‘शनी महाराज की जय’च्या घोषाने परिसर दुमदूमला‎

चांदवड शनैश्वर जयंती शनी अमावास्येनिमित्त तालुक्यातील वरदडी येथील पुरातन शनी मंदिरात शनिवारी (दि. १६) हजारो भाविकांनी शनिदेवाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ओम श्री शनैश्चराय नमः, शनी महाराज की जयच्या घोषाने परिसर दुमदुमून गेला. पहाटे पाच वाजेपासून भा . उज्जैनचा राजा विक्रमादित्य यांना साडेसाती लागली होती. त्या काळात विक्रमादित्य राजाने याच ठिकाणी शनिदेवाची तपश्चर्या करून त्यास…

Read More

फुलंब्रीत सर्वपक्षीय नेत्यांची दिलजमाई:आमदार सत्तारांचा नगराध्यक्ष ठोंबरेंच्या खांद्यावर हात‎

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत अंतर्गत मंजूर विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ शनिवारी पार पडला. मात्र, या कार्यक्रमात रंगलेल्या रंगतदार राजकीय सोहळ्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणातील परस्परांचे कट्टर विरोधक समजले जाणारे दिग्गज नेते एकाच मंचावर एकत्र आल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सर्वपक्षीय ‘दिलजमाई’मागे काही…

Read More

नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या:गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथील घटना‎

तालुक्यातील लखमापूर येथील शेतकऱ्याने नापिकी, कर्जबारीपणास कंटाळून विषारी द्रव प्राशन करीत शनिवारी आत्महत्या केल्याची घटना लखमापूर येथे घडली. चंद्रभान कचरू गाढे (५४) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री चंद्रभान गाढे हे गावातून जाऊन येतो असे सांगून घरातून निघाले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांची शोधाशोध केली पण ते सापडले नाही. शनिवार सकाळी ६…

Read More

कपडे धुण्यास गेलेल्या महिलेसह 3 मुलांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू:नांदूरशिंगोटेतील दुर्घटना, ​डिग्रसच्या कुटुंबावर ओढवला बिकट प्रसंग

नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर) येथील नागरेवस्ती परिसरातील बंधाऱ्यात कपडे धुण्यासाठी गेलेली महिला आणि तिच्यासोबत गेलेल्या तीन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. ​मनीषा विजय रामजोशी (२८), मुलगा कार्तिक विजय रामजोशी (११), तसेच तिचे भाचे आदित्य राहुल शिंदे (७) आणि अविनाश राहुल शिंदे (८, सर्व रा. वडारपुरा, डिग्रस, जि. यवतमाळ) अशी मृतांची नावे आहेत….

Read More

राष्ट्रवादीत ‘पार्थ’ पर्व, तटकरे,पटेल, भुजबळांना ‘स्थान’ नाही:तरीही तटकरे प्रदेशाध्यक्ष तर प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष!

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षात नव्या- जुन्या पिढीतील संघर्ष तीव्र झाला आहे. खासदार पार्थ पवार यांच्या पुढाकाराने निवडणूक आयोगाला सादर राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ या मातब्बरांच . दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयावर खासदार पार्थ समर्थकांनी पूर्ण नियंत्रण मिळवल्याने नाराज ज्येष्ठ नेत्यांनी थेट शरद पवारांकडे धाव घेत ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून मध्यस्थीची…

Read More

प्रयागराजच्या जलाचा अभिषेक अन् महाआरती:शनिजयंतीला भाविकांची गर्दी, 13 वर्षांनंतर जुळून आला शनी अमावास्या-शनिजयंतीचा दुर्मिळ योग

तब्बल १३ वर्षांनंतर आलेला शनी अमावास्या आणि शनिजयंतीचा अत्यंत दुर्मिळ योग शनिवारी संपूर्ण भक्तिमय वातावरणात साजरा झाला. या महायोगाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून २० तास २० मिनिटांच्या या पर्व काळात सुमारे ८ लाख भाविकांनी शनिशिंगणापूरमध्ये दर्शन घेत . यंदा भाविकांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते प्रयागराज, काशी आणि प्रवरासंगम येथून कावडीत…

Read More

नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरण:15 दिवसांत 1100 पानांचे आरोपपत्र दाखल; 50 हून अधिक साक्षीदार, फॉरेन्सिक पुरावे जोडले

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील नराधम आरोपीला कठोरात कठोर आणि फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास चक्रे फिरवून मोठी कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी घटनेच्या अवघ्या १५ दिवसांच्या आत पुणे न्यायालयात तब्बल ११०० पानांचे दोषारोपपत्र…

Read More

श्रीकृष्ण मंदिरात उद्यापासून मानसशास्त्रीबाबांचे प्रवचन:पुरुषोत्तम मासनिमित्त श्री कृष्ण कथा सोहळ्याचे आयोजन

अमरावती येथील द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर, माताखिडकी-बुधवारा येथे महानुभाव वासानिक सेवा मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासनिमित्त (अधिकमास) श्री कृष्ण कथा प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सोमवार, १८ मे रोजी सुरू होणार असून, तो २४ मेपर्यंत सलग चालणार आहे. श्री कृष्ण कथेचे निरूपण दररोज सायंकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत होईल. सिन्नर (जि. नाशिक) येथील कृष्णकथाव्यास…

Read More

वडाळी तलावाजवळ बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारणार:मंत्री संजय राठोड यांनी स्थळाची केली पाहणी

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज, शनिवारी अमरावती येथील वडाळी तलाव परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रस्तावित वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित स्थळाला भेट देऊन विकास कामांचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान मंत्री राठोड यांनी वडाळी उद्यान परिसरात भव्य, आकर्षक आणि दिमाखदार स्मारक उभारण्याचे निर्देश दिले. हे स्मारक शहरातील मुख्य रस्त्यावरून स्पष्टपणे…

Read More

शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये:चांदूरबाजारमध्ये आमदार प्रवीण तायडे यांच्या बँक अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना

चांदूरबाजार प्रतिनिधी: तालुक्यातील कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व बँकांनी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार प्रवीण तायडे यांनी दिल्या. येथील तहसील कार्यालयात आयोजित पीक कर्ज आढावा बैठकीत त्यांनी बँक अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ब्लॉक लेव्हल बँकर्स कमिटीच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार तायडे म्हणाले की, पीक कर्जासाठी बँकेत येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणी…

Read More