Headlines

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची जवाहर नवोदय विद्यालयास भेट:वसतिगृह, भोजनालयाची पाहणी; विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक गुणवत्तेची घेतली माहिती

वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी ता. 29 भेट देऊन विद्यालयातील विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या निवास, आहार व शिक्षणाच्या दर्जाबाबत सविस्तर माहिती घेत समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी विद्यालयातील वसतिगृहाची पाहणी करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या निवास सुविधांची माहिती जाणून घेतली. स्वच्छता, सुरक्षितता तसेच विद्यार्थ्यांच्या…

Read More

सह्याद्री हॉस्पिटलचा न्यूरोसर्जरीत जागतिक विक्रम:5 वर्षांत 750 हून अधिक 'एमव्हीडी' शस्त्रक्रिया यशस्वी

पुण्यातील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने न्यूरोसर्जरी (मेंदू शस्त्रक्रिया) क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गेल्या पाच वर्षांत हॉस्पिटलने ७५० हून अधिक मायक्रोव्हॅस्कुलर डिकंप्रेशन (एमव्हीडी) शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. या विक्रमी कामगिरीमुळे शेकडो रुग्णांना तीव्र वेदनांपासून मुक्ती मिळाली असून, पुणे न्यूरोसर्जरीचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. या ऐतिहासिक यशाची माहिती ज्येष्ठ न्यूरोसर्जन डॉ. जयदेव…

Read More

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे काळाची गरज- डॉ. रघुनाथ माशेलकर:शिक्षण प्रसारक मंडळीच्या 'सहनिर्मिती' कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे आयोजित ‘भविष्य घडवण्यासाठी सहनिर्मिती’ या कार्यक्रमात ते बोलत होते. आजच्या शिक्षण व्यवस्थेसमोर शिक्षणाचा हक्क, योग्य शिक्षण आणि योग्य पद्धतीने दिले जाणारे शिक्षण या तीन महत्त्वाच्या संकल्पना असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण प्रसारक मंडळीने संस्थेच्या…

Read More

धीरेंद्र शास्त्रींचा दावा- ऑक्सिजन बंद होऊनही मुलगा वाचला:नागपुरात ‘चमत्कारा’च्या दाव्यावरून नवा वाद

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुन्हा एकदा नव्या वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या रामकथा कार्यक्रमादरम्यान ‘दिव्य दरबार’मध्ये त्यांनी एका गंभीर आजाराने ग्रस्त बालकाचा जीव “चमत्काराने” वाचल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती (ANIS) आक्रमक झाली असून, त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. कार्यक्रमात बोलताना शास्त्री यांनी…

Read More

लग्नापूर्वीच तरुणीवर काळाचा घाला:भरधाव कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात; दोघींचा मृत्यू तर दोघे गंभीर

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड येथे भरधाव कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात, होणाऱ्या नवरीसह तिच्या वहिनीचा जागीच मृत्यू झाला आहे. शिखा विनायक बेलसरे आणि तिची वहिनी मीना मानकर अशी मृतांची नावे असून, या अपघातात शिखाचे दोन भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. कारचे टायर फुटल्यानंतर वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याखालील झाडावर जोरात आदळले. जखमींना तातडीने…

Read More

अंबादास दानवेंना विधानपरिषदेची उमेदवारी:'आमदारकी, खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान', सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

विधानपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा सध्या केली जात आहे. यात भाजपने प्रज्ञा सातव यांच्यासह 6 नावे जाहीर केली आहेत. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने देखील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी घ्यावी, अशी मागणी कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून केली जात होती. मात्र शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरेंनी अंबादास…

Read More

काँग्रेस विधानपरिषद निवडणुकीत कदाचित उमेदवार देईल:आम्ही अस्वस्थ नाही, सगळ्या गोष्टी जबाबदारीनेच होतील – भाई जगताप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित केली आहे. पण आता त्याला काँग्रेसमधून विरोध होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी असे दिलेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत कदाचित काँग्रेस आपला उमेदवार देईल, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या निवडणुकीवरून चांगलेच राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या…

Read More

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून उमेदवार नसणार:अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार, आदित्य ठाकरे यांची घोषणा

विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत चेहरा कोण असेल, यावरून सुरू असलेल्या सस्पेन्सचा अखेर पडदा फासला आहे. स्वतः उद्धव ठाकरे या निवडणुकीत उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली. महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे विधान परिषदेच्या रिंगणात उतरणार असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच हा निर्णय घेतल्याचे आदित्य…

Read More

Chakankar Brother Defeated; Tatkares Diveagar Gram Panchayat Lost

राज्यातील काही ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक आज पार पडली. त्यात अनेक धक्कादायक निकाल लागलेत. बीडच्या मस्साजोगमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव झाला, तर तिकडे दौंडमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर या . रुपाली चाकणकर ह्या भोंदू अशोक खरात प्रकरणात अडचणीत सापडल्या आहेत. यामुळे त्यांना प्रथम राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद व नंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे…

Read More

पाणीटंचाई व घरकुल आढावा बैठकीस गैरहजर राहणे भोवले:तीन ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित, सीईओ विवेक गायकवाड यांचे आदेश

हिंगोली पंचायत समितीमध्ये आयोजित पाणीटंचाई आढावा बैठक व घरकुल योजनेच्या बैठकीस गैरहजर राहणाऱ्या तीन ग्रामसेवकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश बुधवारी तारीख 29 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढले आहे. या कारवाईमुळे ग्रामसेवक संघटनेत एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्यात सध्या पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या…

Read More