Headlines

CM Fadnavis Meets Captain Smit Machhar Family; Praises Heroic Pilot


आपल्या धैर्याने आणि प्रसंगावधानाने तब्बल 180 प्रवाशांचे प्राण वाचवून भारताचा जागतिक स्तरावर नावलौकिक वाढवणारे वैमानिक कॅप्टन स्मित माच्छर यांच्या शौर्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. गुरुवारी (१ ऑक्टोबर) कॅप्टन स्मित यांच्या काका आणि काकूंची राज्याच

.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी कॅप्टन स्मित यांच्या धैर्याची आणि धाडसाची प्रशंसा केली. “गंभीर दुखापत झालेली असतानाही कॅप्टन स्मित यांनी दाखवलेले प्रसंगावधान केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी गौरवास्पद आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या धाडसाला सलाम केला.

थरारक घटना: कॉकपिटमधील रक्तरंजित संघर्ष

फ्लायदुबईचे (FZ1073) हे विमान दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवला जात होते. प्रवासादरम्यान ओमानच्या सह-वैमानिकाने हे विमान हायजॅक करून पाडण्याचा कट रचला होता. कॉकपिटमध्ये या सह-वैमानिकाने कॅप्टन स्मित यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कॅप्टन स्मित गंभीर जखमी झाले आणि रक्तबंबाळ झाले. मात्र, हार न मानता त्यांनी प्रतिकार केला आणि जीवाच्या आकांताने कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. दरवाजा उघडताच बाहेरील प्रवाशांच्या मदतीने त्यांनी त्या हल्लेखोर सह-वैमानिकाला जेरीस आणले आणि विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवले. या जीवघेण्या संघर्षानंतर कॅप्टन स्मित यांच्यावर सध्या सौदी अरेबियातील तबूक येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधानांनी मानले ‘हिरो’

कॅप्टन स्मित यांनी दाखवलेल्या या अतुलनीय शौर्याची दखल थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. पंतप्रधानांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्मित यांना खऱ्या अर्थाने ‘हिरो’ (Hero) म्हणून संबोधले आहे. इतकेच नाही, तर पंतप्रधानांनी स्मित यांचे पालक आणि त्यांच्या पत्नीशी थेट फोनवरून संवाद साधला असून, या कठीण काळात केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे भक्कम आश्वासनही दिले आहे.

कोण आहेत कॅप्टन स्मित माच्छर?

आपल्या एका धाडसी कृतीने संपूर्ण जगासाठी ‘नायक’ बनलेले कॅप्टन स्मित हे मूळचे मुंबईतील घाटकोपरचे रहिवासी आहेत. त्यांनी आपले वैमानिकाचे व्यावसायिक प्रशिक्षण गुडगाव येथे पूर्ण केले आहे. स्मित यांना विमान उड्डाणाचा मोठा अनुभव असून, त्यांनी तब्बल १० वर्षांहून अधिक काळ ‘स्पाइसजेट’ (SpiceJet) कंपनीसाठी बोईंग विमाने चालवली आहेत. स्पाइसजेटमधील या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ‘वरिष्ठ कमांडर’ आणि त्यानंतर नव्या वैमानिकांना धडे देणारे ‘प्रशिक्षक कॅप्टन’ (Training Captain) म्हणूनही उत्तम कामगिरी बजावली आहे. या प्रदीर्घ अनुभवानंतर २०२२ मध्ये ते पुढील कारकिर्दीसाठी दुबईला स्थायिक झाले होते.

————-

ही बातमी पण वाचा..

आजचे एक्सप्लेनर:खरोखरच 9/11 सारखी घटना घडणार होती का?; त्या 72 मिनिटांची कहाणी, रक्तबंबाळ झालेल्या कॅप्टन स्मितने कसे वाचवले?

30 सप्टेंबर 2026, सकाळी 9 वाजून 21 मिनिटे. सौदी अरेबियाच्या आकाशात अचानक एक विमान नाकाच्या दिशेने खाली कोसळू लागले. काही मिनिटांतच ते 34 हजार फूट उंचीवरून 17 हजार फूटांवर आले. वेगही 760 वरून वाढून 1110 किमी प्रतितास झाला. विमानातील प्रवासी अखेरची प्रार्थना करू लागले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.