- Marathi News
- National
- India’s First AI Satellite; Image Analysis In Space, Successful Launch Of Orbital Computing Satellite, Success For Hyderabad based Startup
मोहम्मद जमीर हसन | हैदराबाद10 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

भारताने आता असा पहिला उपग्रह अंतराळात पाठवला आहे, जो केवळ छायाचित्रे काढून पृथ्वीवर पाठवणार नाही, तर या छायाचित्रांचे विश्लेषण करण्याचे कामही अंतराळातच करेल. हैदराबाद येथील ‘टेकमीटूस्पेस’ या कंपनीचा ‘एमओआई-१ए’ हा उपग्रह स्पेसएक्सच्या ट्रान्सपोर्टर-१८ मिशनद्वारे रात्री ११:४८ वाजता प्रक्षेपित करण्यात आला. हा भारताचा पहिला ‘ऑर्बिटल कॉम्प्युटिंग’ उपग्रह असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रौनक कुमार सामंतराय यांनी सांगितले की, एआय अनावश्यक डेटा वगळून केवळ उपयोगाची माहिती पाठवू शकेल.
देशाला काय फायदा?
- वेळेची बचत : अंतराळातच छायाचित्राची गरजेची माहिती तयार होईल.
- दुसरा: डेटा पाठवण्याचा खर्च आणि यंत्रणेवरील भार कमी होईल.
उपग्रहात नेमके काय विशेष ?
- ‘एमओआय-१ए’चे वजन ५० किलोपेक्षा कमी असून, यात ११७ टॉप्सपर्यंत कॉम्प्युटिंग क्षमता असणारी यंत्रणा आहे. एनव्हिडियाच्या एनओरिन एनएक्स कॉम्प्युटरच्या मदतीने हा उपग्रह अवकाशातच एआय मॉडेल चालवू शकेल.
- कंपनीच्या माहितीनुसार, त्यांची ‘ऑर्बिट लॅब’ ग्राहकांना स्वतःचे एआय मॉडेल उपग्रहावर चालवण्याची सुविधाही देईल. कंपनीनुसार २३ ग्राहक या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
शेती, खाणकाम, आपत्ती व्यवस्थापन आदी कामांना गती
मुळे शेती, खाणकाम, विमा, आपत्ती व्यवस्थापन, सीमा किंवा जमिनीवर पाळत ठेवणे अशा कामांना वेग येऊ शकतो. उदा., एखाद्या भागात पूर आल्यास उपग्रह तेथील छायाचित्र काढून पाणी किती भागात पसरले आहे, याचा अंदाज बांधू शकेल. त्यानंतर संपूर्ण छायाचित्र पृथ्वीवर पाठवण्याऐवजी केवळ आवश्यक ती माहितीच खाली पाठवली जाऊ शकते.
२०२८ मध्ये अंतराळात डेटा सेंटर
- कंपनीने २०२८ साठी मोठ्या डेटा केंद्राची योजना जाहीर केली. यानुसार अधिक क्षमतेचे प्रत्येकी १०० किलोचे दोन उपग्रह पाठवले जातील.
- प्रत्येक उपग्रहात मोठ्या प्रमाणावर ग्राफिक्स प्रोसेसर व व १०० टेराबाइट साठवणूक क्षमता ठेवण्याचे नियोजन आहे. या उपग्रहांना जोडून अवकाशात नेटवर्कसारखा वापर करण्याचे उद्दिष्ट आहे. याने डेटा विश्लेषणात मदत होईल.
भारत जगात चौथा देश
अमेरिका, युरोपीय संघ आणि चीननंतर अवकाशातच डेटा आणि छायाचित्रांचे एआय विश्लेषण करण्याची क्षमता असणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.