कुर्डुवाडीचे ट्रॉमा केअर व्हेंटिलेटरवर:सात कोटींची इमारत पडली धूळखात, 2 वर्षांपासून रंगरंगोटी पूर्ण, पण ना डॉक्टर ना उपकरणे
कुर्डुवाडी शहर आणि परिसरातून जाणाऱ्या महामार्गांवर रक्ताचे सडे पडत आहेत. अपघातानंतरच्या अत्यंत महत्त्वाच्या ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींना जीवदान मिळणे अपेक्षित असताना, कुर्डुवाडीत कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले ‘ट्रॉमा केअर सेंटर’ केवळ प्रशासकीय उदासीनतेचा नमुना ठरत आहे. इमारत सज्ज आहे, पण ती केवळ शोभेची वास्तू बनली असून जखमींना आजही सोलापूर किंवा बार्शीची वाट धरावी लागत आहे. राज्य शासनाने…