नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपची जोरदार तयारी:दिवसाला थेट 40 हजार मतदारांशी संपर्क, पारंपारिक गड राखण्यासाठी ताकद पणाला
नागपूर पदवीधर मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या नेहमीच महत्त्वाचा राहिला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे या मतदारसंघाशी भावनिक नाते जोडलेले आहे. एकेकाळी फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस आणि नंतर स्वतः नितीन गडकरी यांनी विधानपरिषदेत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे या मतदारसंघातील आगामी निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली असून, पहिल्या…